नोकरदार व्यक्तींनी रिटायरमेंट नंतरच्या स्वतःच्या आणि कुटुंबाचा आर्थिक जीवनाचा विचार योग्य वेळी करणे आवश्यक आहे. ही वेळ खरे तर पहिल्या पगारापासूनच योग्य असते. परंतु तसे विचार तरुणपणी येत नसतात आणि जसजसे वय वाढते तसतसे आर्थिक ताण-तणाव वाढत जातात. याचे मुख्य कारण आर्थिक नियोजनाचा अभाव हेच असते.
रिटायरमेंटनंतर आर्थिक नियोजन का आवश्यक?सरकारी नोकरीत पेन्शन योजना बंद केली गेली आहे. खासगी नोकरीतून रिटायरमेंटनंतर ईपीएफओमार्फत दिली जाणारी पेन्शन रक्कम पुरेशी नसते. व्यवसायात असाल तर पेन्शन मिळण्याचा प्रश्नच येत नाही.
असे करा नियोजनएनपीएस अकाउंट सुरू करा. नोकरी लागताच राष्ट्रीय पेन्शन योजनेचे सभासद व्हा आणि प्रत्येक महिन्याला ठराविक रक्कम जमा करीत रहा. इक्विटी/ सरकारी कर्ज रोखे / कंपनी डेब फंड यात तीन प्रकारांतील योग्य प्रमाण निवडून त्याचे विभाजन करा. साठाव्या वर्षांनंतर पेन्शन सुरू होते आणि त्यावेळेला आवश्यक भासल्यास ठराविक रक्कमसुद्धा काढता येते.
नोकरी लागताच पैसे उधळपट्टीवर भर अधिक असतो. आयुष्यात पर्सनल महागडी गॅझेट्स, उच्च किमतीची वाहने, मनोरंजन, प्रवास यावर खर्च जरूर करा परंतु रिटायरमेंट नंतरच्या आयुष्यासाठीची तरतूद आणि बचत याला खर्चाच्या यादीत प्रथम क्रमांकावर ठेवा. महिन्याच्या उत्पन्नात त्याचे नियोजन प्राधान्याने करा. अशा विचारांत दडली आहे खरी अर्थनीती.
अटल पेन्शन योजनावयाच्या अठराव्या ते चाळीस वर्षांपर्यंत या योजनेत सहभागी होता येते. कोणत्याही राष्ट्रीयीकृत बँकेत हे खाते सुरू करा आणि जास्तीतजास्त रुपये ५ हजार प्रतिमाह इतकी पेन्शन मिळवा. आपले वयानुसार प्रत्येक महिन्याचा ठराविक हप्ता परस्पर बँक खात्यातून वळता केला जातो.
एलआयसी पेन्शन योजनाएलआयसीमार्फत विविध पेन्शन योजना आहेत. त्याचा अभ्यास करा आणि आपणास योग्य अशा पेन्शन योजनेत सहभागी व्हा. यात प्रत्येक महिना / वर्ष आणि एकरकमी रक्कम भरणा असे विविध पर्याय उपलब्ध आहेत.