Join us

Jio, Airtel आणि Vi चा २८ नाही तर ३० दिवसांचा रिचार्ज प्लॅन; तुमच्यासाठी कोणता बेस्ट?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2024 3:41 PM

Jio, Airtel And Vi : जर तुम्ही संपूर्ण महिन्यासाठी म्हणजेच ३० दिवसांची वैधता असलेला प्लान शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची असणार आहे.

Jio, Airtel And Vi : सिमकार्ड रिचार्जच्या वाढत्या किमतीमुळे मोबाईल वापरणे दिवसेंदिवस महाग होत चाललं आहे. काही महिन्यांपूर्वी जिओ, एअरटेल आणि व्हीआय या सर्व टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्या रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढवल्या होत्या. अशात स्वस्तात मस्त रिचार्ज प्लॅनसाठी प्रत्येकाचा शोधाशोध सुरू असते. बहुतेक लोक १ महिन्याच्या वैधतेसह रिचार्ज प्लॅन खरेदी करतात. परंतु, जवळजवळ सर्व टेलिकॉम कंपन्या फक्त २८ दिवसांचा प्लॅन ग्राहकांना देतात.

टेलिकॉम कंपन्या Jio, Airtel आणि Vi मुख्यतः २८ दिवसांच्या वैधतेसह रिचार्ज प्लॅन ऑफर करतात. अशा परिस्थितीत जर तुम्ही संपूर्ण महिन्याची म्हणजेच ३० दिवसांची वैधता असलेला प्लान शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची असणार आहे. आम्ही तुम्हाला Jio, Airtel आणि Vi च्या 1 महिन्याची वैधता असलेल्या प्लॅनची माहिती देणार आहोत.

Jio चा 1 महिचा रिचार्ज प्लॅनतुम्ही जिओचा रिचार्ज प्लॅन ३१ दिवसांच्या वैधतेसह ३१९ रुपयांमध्ये खरेदी करू शकता. जिओच्या या ३१ दिवसांच्या वैधतेच्या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज १.५ जीबी डेटा मिळेल. याशिवाय, दररोज १०० एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधाही या प्लॅनमध्ये समाविष्ट आहे.

एअरटेल १ महिन्याचा रिचार्ज प्लॅनतुम्ही ३७९ रुपयांमध्ये ३१ दिवसांच्या वैधतेसह एअरटेलचा रिचार्ज प्लॅन खरेदी करू शकता. एअरटेलच्या या ३१ दिवसांच्या वैधतेच्या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज २GB डेटा मिळेल. याशिवाय अनलिमिटेड कॉलिंगची सुविधाही या प्लॅनमध्ये आहे.

Vi चा १ महिन्याचा रिचार्ज प्लॅनतुम्ही केवळ २१८ रुपयांमध्ये १ महिन्याच्या वैधतेसह Vi चा रिचार्ज प्लॅन खरेदी करू शकता. या प्लॅनमध्ये तुम्हाला १ महिन्यासाठी ३GB डेटा आणि ३०० SMS दिले जातील. याशिवाय अनलिमिटेड कॉलिंगची सुविधाही या प्लॅनमध्ये आहे. यात आता तुमच्या रोजच्या डेटानुसार तुम्ही प्लॅन खरेदी करू शकता.

टॅग्स :जिओएअरटेलव्होडाफोन आयडिया (व्ही)