Lokmat Money > बिझनेस न्यूज > प्लॅस्टिक बंदीने एसटीचा वर्धापन दिन साजरा

प्लॅस्टिक बंदीने एसटीचा वर्धापन दिन साजरा

राज्यभर प्लॅस्टिक बंदीचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2018 04:47 AM2018-06-01T04:47:37+5:302018-06-01T04:47:37+5:30

राज्यभर प्लॅस्टिक बंदीचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.

Plastic ban celebrates anniversary of ST | प्लॅस्टिक बंदीने एसटीचा वर्धापन दिन साजरा

प्लॅस्टिक बंदीने एसटीचा वर्धापन दिन साजरा

मुंबई : राज्यभर प्लॅस्टिक बंदीचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. या धर्तीवर एसटी महामंडळाने ७०वा वर्धापन दिन साजरा करताना सर्व आगारांना बॅनर आणि प्लॅस्टिकचा वापर टाळा आणि ‘एसटीच्या ७०व्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!’ असे कापडी फलक सर्व बस स्थानकांवर लावा, असे आदेश एसटी महामंडळाने दिले आहेत. यामुळे वर्धापन दिनी महामंडळाने स्तुत्य उपक्रमाने नव्या वर्षात पदार्पण केल्याचे स्पष्ट होते.
शुक्रवारी एसटी महामंडळाचा ७०वा वर्धापन दिन आहे. १ जून १९४८ रोजी अहमदनगर-पुणे मार्गावर पहिली एसटी धावली होती. यामुळे १ जून हा एसटी महामंडळाचा वर्धापन दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
एसटीच्या वर्धापन दिनाला वाढते इंधन दर, कर्मचाऱ्यांचा वेतन करार असे विविध प्रश्न आ वासून उभे आहेत. असे असले तरी राज्यातील २५० आगारांना पारंपरिक पद्धतीने सोहळा साजरा करण्याचे आदेश दिल्याचे महामंडळाने स्पष्ट केले. वर्धापन दिनी मार्गस्थ होणाºया सर्व एसटी तांत्रिकदृष्ट्या निर्दोष असतील याची योग्य तपासणी करूनच रवाना करा.
याचबरोबर ‘एसटीच्या ७०व्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!’ असे कापडी फलक प्रत्येक बस स्थानकावर लावण्याचे आदेश दिले आहेत. ज्या आगारांना वातानुकूलित शिवशाही बस देण्यात आल्या आहेत त्यांनी शुक्रवारपासून नव्या मार्गावर शिवशाही सुरू करावी, अशा सूचनादेखील महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल यांनी दिली.

ज्येष्ठांना शिवशाहीत ३० टक्के सूट
महामंडळाच्या अत्याधुनिक आणि वातानुकूलित शिवशाहीमध्ये शुक्रवारपासून ज्येष्ठ नागरिकांना तिकीट दरांमध्ये सवलत देण्यात येणार आहे. बैठे आसने असलेल्या शिवशाहीत ४५ टक्के आणि शयनयान आसने असलेल्या शिवशाहीत ३० टक्के सूट देण्यात आली आहे. एसटी महामंडळाच्या पारंपरिक बसमध्ये ज्येष्ठ नागरिकांना तिकीट दरामध्ये ५० टक्के सवलत आहे.

३० टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव
वाढते इंधनदर, रखडलेला वेतनकरार आणि टोल दरात झालेली अवास्तव वाढ यामुळे एसटी महामंडळाने ३० टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव परिवहनमंत्री आणि एसटी अध्यक्ष दिवाकर रावते यांच्याकडे सादर केला आहे. डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे एसटीला ४७० कोटी रुपयांचा अतिरिक्त तोटा सहन करावा लागत आहे. या प्रस्तावावर मंत्री रावतेंच्या निर्णयावर प्रवासी भाडेवाढ अवलंबून आहे.

वेतन कराराची आशा
वर्धापन दिनी दोन वर्षांहून अधिक काळ रखडलेल्या वेतन कराराची घोषणा होणार असल्याची शक्यता महामंडळातील सूत्रांनी वर्तवली आहे. मात्र याबाबत अधिकृत माहिती देण्यास अधिकारी तयार नाहीत. वेतनकरार करण्याचे सर्वाधिकार परिवहन मंत्री आणि महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांना आहेत. यामुळे मंत्री रावते हेच वेतनकराराबाबत अधिकृत माहिती देऊ शकतील, अशी माहिती वरिष्ठ अधिकाºयांनी दिली.

Web Title: Plastic ban celebrates anniversary of ST

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.