Join us

प्लॅस्टिक बंदीची कु-हाड; ४.५ लाख लोक बेरोजगार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 2:21 AM

प्लॅस्टिक बंदीमुळे ४.५० लाख रोजगारांवर कुºहाड येणार आहे. सर्व प्रकारच्या प्लॅस्टिकचा विविध प्रकारे पुनर्वापर शक्य आहे. यामुळे आधी तसे धोरण आणा. सरसकट बंदीची गरजच नाही, अशी मागणी महाराष्टÑ प्लॅस्टिक उत्पादक असोसिएशनने केली आहे.

मुंबई : प्लॅस्टिक बंदीमुळे ४.५० लाख रोजगारांवर कुºहाड येणार आहे. सर्व प्रकारच्या प्लॅस्टिकचा विविध प्रकारे पुनर्वापर शक्य आहे. यामुळे आधी तसे धोरण आणा. सरसकट बंदीची गरजच नाही, अशी मागणी महाराष्टÑ प्लॅस्टिक उत्पादक असोसिएशनने केली आहे.राज्य सरकारने १ एप्रिलपासून प्लॅस्टिक बंदीचा निर्णय घेतला. त्यामुळे सर्व प्रकारच्या प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी येणार आहे. त्याआधीच प्रशासनाकडून काही कारखान्यांवर धाडीही घातल्या जात असल्याचा असोसिएशनने निषेध केला आहे.असोसिएशनचे अध्यक्ष रवी जश्नानी यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा सिमेंटच्या भट्टीसाठी उपयोग होऊ शकतो. यासंबंधीचा प्रस्ताव आम्ही आधीच सरकारला दिला आहे. पण सरकारकडून या प्रस्तावावर निर्णय घेण्यात आलेला नाही. उलट अधिसूचना न काढता थेट बंदी घालण्यात आली आहे. प्रशासनाकडून कारखानदारांना त्रास देणे मात्र सुरू झाले आहे.राज्यात प्लॅस्टिकचे २,१५० कारखाने आहेत. त्यातील थेट रोजगार २ लाख व अप्रत्यक्ष रोजगार ४.५० लाखांहून अधिक आहे. एका कारखान्यात प्लॅस्टिकच्या वेगवेगळ्या जाडीच्या पिशव्यांपासून ते प्लॅस्टिकच्या वस्तू तयार करण्यापर्यंत सर्वच कामे होतात. यामुळे केवळ पिशव्यांचे उत्पादन बंद करता येत नाही. या बंदीमुळे पूर्ण कारखानेच बंद पडतील, असे मत प्लॅस्टिक मॅन्युफॅक्चरर्स सोशल वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ व्ही. कामत यांनी व्यक्त केले.जीडीपीतील वाटाप्लॅस्टिक व संलग्न उत्पादन उद्योगाचा देशाच्या जीडीपीत ३० टक्के व राज्याच्या जीडीपीत ३५ टक्के वाटा आहे. यामुळेच ही बंदी या उद्योगातील रोजगाराला संपुष्टात आणणारी असेल, अशी भीती थर्मोफार्मर्स अ‍ॅण्ड अलाइड इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष हर्षित मेहता यांनी व्यक्त केली.

टॅग्स :प्लॅस्टिक बंदी