मुंबई : देशभरातील किरकोळ व्यापाऱ्यांच्या रिटेलर्स असोसिएशन आॅफ इंडिया या संघटनेने राज्य सरकारच्या प्लॅस्टिकबंदीच्या निर्णयाचे स्वागत केले असून, आम्ही टप्प्याटप्प्याने त्याची अंमलबजावणी करू, आम्ही ग्राहकांना प्लॅस्टिक बॅगा देणार नाही. मात्र, मोठी प्लॅस्टिक आवरणे वा पॅकेजिंगचा अविभाज्य भाग असलेल्या प्लॅस्टिकला परवानगी द्यावी, असे आवाहन सरकारला केले आहे.
कडधान्ये, डाळी, साखर, इतर धान्ये फळे आणि भाज्या, बेकरी उत्पादने, मटन, मासे चिकन व अंडी आदींच्या पॅकेजिंगला प्लॅस्टिक पिशव्यांच्या व्याख्येत आणू नये. असे पॅकेजिंग उत्पादन सील
करण्यासाठी वापरत नसले, तरी संरक्षक प्लॅस्टिक कवच म्हणून त्याचा उपयोग होतो, तसेच संबंधित वस्तू त्यात ताज्या राहतात, असे संघटनेचे म्हणणे आहे.
मटन, मासे, चिकन, तसेच ओली फळे व भाज्या कागदामध्ये ठेवता येत नाहीत. त्यांना प्लॅस्टिकचेच आवरण फायद्याचे ठरते, हे निदर्शनास आणून देताना, ग्राहकांनी घरून येताना पिशवी आणावी, असे फलक आम्ही
दुकानांत लावू आणि पर्यावरणाची हानी होणार नाही, यासाठी प्रयत्न करू, असेही संघटनेने म्हटले आहे. या संघटनेने अनेक सूचनाही केल्या आहेत.
‘पॅकिंगच्या प्लॅस्टिकवर बंदी आणली जाऊ नये’
देशभरातील किरकोळ व्यापाऱ्यांच्या रिटेलर्स असोसिएशन आॅफ इंडिया या संघटनेने राज्य सरकारच्या प्लॅस्टिकबंदीच्या निर्णयाचे स्वागत केले असून, आम्ही टप्प्याटप्प्याने त्याची अंमलबजावणी करू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 02:54 AM2018-03-28T02:54:23+5:302018-03-28T02:54:23+5:30