मुंबई : अवघ्या ३० लाख रुपयांच्या भांडवली गुंतवणुकीतून प्लास्टिकची पुनर्प्रक्रिया शक्य आहे. यामुळे प्लास्टिकवर सरसकट बंदी घालण्याऐवजी सरकारने हे प्रकल्प उभे करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन उत्पादकांनी बुधवारी केले. प्लॅस्टिक बॅग मॅन्युफॅक्चर्स असोसिएशननेही बंदीच्या पुनर्विचाराची मागणी केली आहे.
राज्यात १ एप्रिलपासून लागू होणाऱ्या बंदीचा आॅल इंडिया प्लास्टिक मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने विरोध केला.
बंदीमुळे ४ लाख रोजगार असलेल्या ५ हजार कोटी रुपयांच्या व्यावसायावर परिणाम होईल. सरकारच्याही ८०० कोटी रुपयांच्या जीएसटीचे नुकसान होईल. हा निर्णय मागे न घेतल्यास प्रसंगी न्यायालयात जाऊ, असे असोसिएशनचे अध्यक्ष हितेन भेडा यांनी सांगितले.
३० लाखांत प्लास्टिकची पुनर्प्रक्रिया शक्य
अवघ्या ३० लाख रुपयांच्या भांडवली गुंतवणुकीतून प्लास्टिकची पुनर्प्रक्रिया शक्य आहे. यामुळे प्लास्टिकवर सरसकट बंदी घालण्याऐवजी सरकारने हे प्रकल्प उभे करण्यासाठी सहकार्य करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 04:03 AM2018-03-29T04:03:07+5:302018-03-29T04:03:07+5:30