मुंबई : प्लेक्स काऊन्सिलच्या तीनही गटांतील प्रथम क्रमांकाचे निर्यात क्षेत्रातील पुरस्कार जैन इरिगेशनला बहाल करण्यात आले. येथे झालेल्या गौरव सोहळ्यात प्लेक्स काऊन्सिलचे माजी अध्यक्ष डॉ. हिरू एन. पटेल यांच्या हस्ते प्लास्टिक एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिलचे २०१३-१४ व २०१४-१५ या दोन आर्थिक वर्षातील एकूण सहाही गटांचे प्रथम पुरस्कार देऊन कंपनीला गौरविण्यात आले.
जैन इरिगेशनने प्लास्टिक उत्पादनांच्या निर्यातीत उच्चांक राखल्याने २०१३-१४ या वर्षासाठी कंपनीला पीव्हीसी शीट, पीव्हीसी पाईप आणि होजेस, ठिबक सिंचन विभागांत पहिल्या क्रमांकाच्या पारितोषिकाने गौरविण्यात आले. २०१४-१५ या वर्षासाठी पीव्हीसी शीट, पीव्हीसी पाईप आणि होजेस, ठिबक सिंचन विभागांतही गौरविण्यात आले. दोन्ही वर्षांचे पुरस्कार कंपनीच्या वतीने सी.ए. जोशी, प्रवीण कुमत, अशोक अग्रवाल, विवेक डांगरीकर, पी. डी. गोरे आणि सी. आर. वासुदेवन यांनी स्वीकारले. मानचिन्ह, प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. (प्रतिनिधी)
जैन इरिगेशनला ‘प्लेक्स’चे पुरस्कार
प्लेक्स काऊन्सिलच्या तीनही गटांतील प्रथम क्रमांकाचे निर्यात क्षेत्रातील पुरस्कार जैन इरिगेशनला बहाल करण्यात आले. येथे झालेल्या गौरव सोहळ्यात प्लेक्स काऊन्सिलचे माजी
By admin | Published: September 30, 2015 11:57 PM2015-09-30T23:57:18+5:302015-09-30T23:57:18+5:30