Join us

प्लंबेक्स इंडिया २०२४ हे देशातील प्लंबिंग उद्योगातील नवोन्मेष आणि संपर्काचे सर्वांत मोठे केंद्र ठरेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2024 8:17 PM

यावर्षी प्लंबेक्स प्रदर्शनामध्ये अत्याधुनिक उत्पादने, नेटवर्किंग आणि नावीन्यपूर्ण तांत्रिक माहिती मिळेल.

देशातील पाणी, स्वच्छता आणि प्लंबिंग उद्योगातील प्रमुख प्रदर्शन, प्लंबेक्स इंडिया २०२४मध्ये यावेळी अनेक नावीन्यपूर्ण गोष्टी पाहायला मिळतील. भारतीय प्लंबिंग असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष गुरुमित सिंग अरोरा यांनी त्यांच्या मुलाखतीत याबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले, की यावर्षी प्लंबेक्स प्रदर्शनामध्ये अत्याधुनिक उत्पादने, नेटवर्किंग आणि नावीन्यपूर्ण तांत्रिक माहिती मिळेल.  

पाणी, स्वच्छता आणि प्लंबिंग उत्पादनांसाठी भारतातील सर्वांत मोठे प्रदर्शन म्हणून, प्लंबेक्स इंडिया प्रदर्शन उद्योजक, व्यावसायिक आणि भागधारकांसाठी महत्त्वाचे का ठरते?

प्लंबेक्स इंडिया २०२४ हे प्रदर्शन भारतातील पाणी, स्वच्छता आणि प्लंबिंग उद्योगातील व्यावसायिक आणि भागधारकांसाठी प्रमुख उपक्रम आहे.  नेटवर्किंग, नवी उत्पादने  दाखल करण्यासाठी आणि व्यावसायिक उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम करते. सॅनिटरीवेअर, बाथरूम फिक्श्चर आणि फिटिंग्ज, पाईप्स आणि फिटिंगसह अनेक क्षेत्रांचा समावेश यात असल्याने हे प्रदर्शन आर्किटेक्ट्स, इंटिरियर डिझायनर्स, रिअल इस्टेट डेव्हलपर्स आणि एमईपी सल्लागार यांसारख्या उच्चस्तरीय व्यावसायिकांना आकर्षित करते. याशिवाय, ते पाण्याच्या क्षेत्रात काम करणाऱ्या स्टार्टअप्सना त्यांचे काम दाखविण्याची संधी देते. उत्पादनांचे प्रात्यक्षिक, बी टू बी मीटिंग आणि रिव्हर्स बायर सेलर मीटिंग या वैशिष्ट्यांनी सुसज्ज अशा या प्रदर्शनामध्ये १५,००० हून अधिक व्यावसायिक आणि २०० हून अधिक प्रदर्शक सहभागी होतील, अशी अपेक्षा आहे.

प्लंबेक्स इंडिया २०२४ मध्ये कोणत्या प्रकारची उत्पादनांची श्रेणी पहायला मिळेल?

प्लंबेक्स इंडिया २०२४ या प्रदर्शनाला भेट देणाऱ्या व्यावसायिकांना पाणी, स्वच्छता आणि प्लंबिंगमधील अनेक नावीन्यपूर्ण कल्पनांचे सादरीकरण पाहण्याची संधी मिळेल. अत्याधुनिक सॅनिटरीवेअरपासून ते बाथरूम फिक्श्चर आणि फिटिंगपर्यंत, उपस्थितांना प्रगत तंत्रज्ञान आणि नवी डिझाइन पाहायला मिळतील. या कार्यक्रमात पाणी टंचाई , पाणी शुद्धीकरण आणि पुनर्वापर साखळी यांसारख्या गंभीर समस्यांचे निराकरण करणारे अत्याधुनिक तंत्रज्ञानदेखील प्रदर्शित केले जाईल. याव्यतिरिक्त अग्निशमन उपकरणे, सुरक्षा यंत्रणेबाबतची आधुनिक   प्रणालीही पाहता येतील आणि त्यांची माहिती घेता येईल.

हे प्रदर्शन नेटवर्किंग, बी टू बी मीटिंग आणि उद्योगातील भागधारकांमधील सहकार्यवृद्धीला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या संधी देते?

प्लंबेक्स इंडिया २०२४ हे व्यासपीठ बांधकाम क्षेत्र आणि प्लंबिंग उद्योगाला जोडण्यासाठी आणि त्यांच्यातील सहकार्य वाढवण्यासाठी समर्पित आहे. इंडियन प्लंबिंग असोसिएशनने आयोजित केलेला हा उपक्रम नेटवर्किंग आणि भागीदारीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो. हा उपक्रम आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याच्या उद्देशाने इंडियन प्लंबिंग असोसिएशनने इंडो आफ्रिकन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीशी भागीदारी केली आहे. त्यामुळे विविध आफ्रिकन देशांचे प्रतिनिधी रिव्हर्स बायर-सेलर मीटमध्ये सहभागी होतील. प्रदर्शक आणि भेट देणाऱ्यांना आंतरराष्ट्रीय व्यावसायिकांशी संपर्क साधण्याची आणि नवीन व्यवसायसंधी शोधण्याची संधी मिळेल.

भारतातील प्लंबिंग उद्योगाच्या वाढीसाठी हे प्रदर्शन कसा हातभार लावेल?

इंडियन प्लंबिंग असोसिएशन (IPA) ही भारतातील प्लंबिंग उद्योगाच्या वाढीला प्रोत्साहन देण्यासाठी समर्पित आहे. तिच्या उद्दिष्टांमध्ये   प्लंबिंगला शाश्वत विकास आणि सार्वजनिक आरोग्यासाठी योगदान देणारा एक मान्यताप्राप्त आणि आदरणीय व्यवसाय म्हणून स्थापित करण्यासारख्या अनेक महत्त्वपूर्ण उद्दिष्टांचा समावेश आहे. यामध्ये सार्वजनिक आरोग्य आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी प्लंबिंगच्या महत्त्वाविषयी जागरूकता वाढवताना, शिक्षण आणि प्रशिक्षण कार्यक्रमांद्वारे प्लंबिंग व्यावसायिकांचे कौशल्य आणि ज्ञान वाढवणारी धोरणे आणि नियम तयार करण्याचाही समावेश आहे.

कौन्सिल ऑफ आर्किटेक्ट्स (CoA), क्रेडाई, नरेडेको यांसारख्या विविध सहाय्यक संघटनांशी आयपीए कसे सहकार्य करते?

इंडियन प्लंबिंग असोसिएशन (IPA) बांधकाम उद्योग व्यावसायिकांसाठी प्लंबेक्स इंडियाचे यश सुनिश्चित करण्यासाठी काउन्सिल ऑफ आर्किटेक्चर (COA), क्रेडाई, नरेडेको आदी विविध संघटनांच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करते. या संस्थांसोबत आयपीएने सामंजस्य करार केले आहेत, जे त्यांच्या भागीदारी आणि परस्पर सहकार्याची वचनबद्धता अधोरेखित करतात. या भागीदार संघटना प्लंबेक्स इंडिया २०२४ चा प्रचार करण्यासाठी आणि त्यांच्या सदस्यांना कार्यक्रमात सहभागी होण्याकरिता प्रोत्साहन देण्यासाठी एकत्र काम करतात. या असोसिएशनच्या सदस्यांना प्लंबेक्स इंडिया २०२४ ला भेट देण्याचे निमंत्रण देऊन, आयपीएचे उद्दिष्ट एक पूरक वातावरण निर्माण करणे आहे जिथे उद्योग व्यावसायिक विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी, संधी शोधण्यासाठी आणि भागीदारी करण्यासाठी एकत्र येतात.

टॅग्स :व्यवसाय