नवी दिल्ली : मोदी सरकारने पंतप्रधान आवास योजनेला (PM Awas Yojana) दोन वर्षांसाठी मुदतवाढ दिली आहे. आता या योजनेचा लाभ 2024 पर्यंत मिळू शकणार आहे. या योजनेअंतर्गत सध्या एकूण 122 लाख घरांना मंजुरी देण्यात आली असून यापैकी 65 लाख घरे बांधण्याचे काम पूर्ण (PM Awas Yojana Benefits) झाले आहे. याचबरोबर, उर्वरित घरांचे बांधकामही पूर्ण केले जाणार आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून सरकार देशातील गरीब आणि दुर्बल आर्थिक घटकातील लोकांना स्वतःचं घर देते. या योजनेच्या माध्यमातून ज्यांना स्वतःचं घर नाही अशा लोकांना आर्थिक मदत केली जाते. या योजनेद्वारे, विधवा, अनुसूचित जाती-जमाती (SC/ST) लोकांनाही या योजनेचा लाभ मिळतो. ही घरांमध्ये पाण्याचे कनेक्शन, शौचालये आणि वीज इत्यादी अनेक मूलभूत सुविधा मिळतात.
पंतप्रधान आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने 3 उत्पन्न स्लॅब तयार केले आहेत. पहिली कॅटगरी म्हणजे, ज्या लोकांचे उत्पन्न 3 लाखांपेक्षा कमी आहे, तर दुसरी कॅटगरी म्हणजे ज्यांचे उत्पन्न 3 ते 6 लाखांच्या दरम्यान आहे. तसेच, तिसरी कॅटगरी म्हणजे ज्या लोकांचे उत्पन्न 6 ते 12 लाखांच्या दरम्यान आहे. यामध्ये सरकार तीन हप्त्यांमध्ये पैसे देते. पहिला हप्ता 50 हजार रुपये, दुसरा हप्ता 1.50 लाख रुपये आणि तिसरा हप्ता 2.50 लाख रुपये आहे.
योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया...- योजनेसाठी अर्ज करण्यासाठी सर्वात आधी pmaymis.gov.in ला भेट द्या.- त्यानंतर 'Citizen Assessment'हा पर्याय निवडा.- पुढे तुमचा आधार क्रमांक टाका.- त्यानंतर ऑनलाइन फॉर्म भरा.- हा अर्ज सबमिट करा.- त्यानंतर त्याची प्रिंट काढून सोबत ठेवा.