Lokmat Money > बिझनेस न्यूज > PM Awas Yojana: पंतप्रधान आवास योजनेसंदर्भात सरकारची मोठी घोषणा! लाभार्थी होतील खूश

PM Awas Yojana: पंतप्रधान आवास योजनेसंदर्भात सरकारची मोठी घोषणा! लाभार्थी होतील खूश

पंतप्रधान आवास योजनेसंदर्भात सरकारने मोठी घोषणा केली आहे...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2022 10:47 PM2022-11-11T22:47:26+5:302022-11-11T22:51:02+5:30

पंतप्रधान आवास योजनेसंदर्भात सरकारने मोठी घोषणा केली आहे...

PM Awas Yojana Government's big announcement regarding Pradhan Mantri Awas Yojana cabinet decide pm awas yojana gramin extended till 2024 | PM Awas Yojana: पंतप्रधान आवास योजनेसंदर्भात सरकारची मोठी घोषणा! लाभार्थी होतील खूश

PM Awas Yojana: पंतप्रधान आवास योजनेसंदर्भात सरकारची मोठी घोषणा! लाभार्थी होतील खूश

आपण पंतप्रधान आवासचे लाभार्थी असाल तर ही बातमी खास आपल्यासाठी आहे. पंतप्रधान आवास योजनेसंदर्भात सरकारने मोठी घोषणा केली आहे. सरकारच्या या घोषणेनंतर आपल्याला मोठा फायदा होणार आहे. आता पंतप्रधान आवास योजना- ग्रामीण (PMAY-G Scheme) 2024 पर्यंत सुरू ठेवण्यास मंजुरी देण्यात आली आहे. 

पीएम आवास योजनेसंदर्भात मोठी घोषणा - 
सरकारने पीएम आवास योजना- ग्रामीण अंतर्गत 2.95 कोटी पक्की घरे देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. आतापर्यंत सुमारे 2 कोटी पक्की घरे बांधून देण्यात आली आहेत. मात्र अद्यापही अनेक कुटुंबे बाकी आहेत, हे लक्षात घेत सरकारने 2024 पर्यंत पंतप्रधान आवास योजना ग्रामीण सुरू ठेवण्यास मंजुरी दिली आहे. लाखो ग्रामस्थांना याचा फायदा होणार आहे.

सरकारने दिली माहिती -  
सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, या योजनेत केंद्र सरकारचे एकूण 1,43,782 कोटी रुपये खर्च होणार आहेत. यात नाबार्डला द्याव्या लागणाऱ्या लोनच्या इंट्रेस्ट पेमेंटसाठी 18,676 कोटी रुपयांचाही समावेश आहे. सरकार या योजनेच्या माध्यमाने डोंगराळ राज्यांनाही 90 टक्के आणि 10 टक्यांनुसार पैसे देते. तसेच, केंद्र आणि राज्यांचा 60 टक्के आणि 40 टक्क्यांनुसार पैसे देते. तर केंद्र शासित प्रदेशांत 100 टक्के पैसे देते.

शौचालय बनविण्यासाठीही मिळतात पैसे - 
सरकार स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत शौचालय बनविण्यासाठीही 12,000 रुपये देते. जे घराच्या बांधकामाव्यतिरिक्त दिली जाते. या योजनेंतर्गत प्रत्येक कुटुंबासाठी पक्के घर, पाणी, वीज आणि शौचालय उपलब्ध करून देण्याचा सरकारचा संकल्प पूर्ण हेत आहे.
 

Web Title: PM Awas Yojana Government's big announcement regarding Pradhan Mantri Awas Yojana cabinet decide pm awas yojana gramin extended till 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.