नवी दिल्ली : पीएम आवास योजनेच्या (PM Awas Yojana) लाभार्थ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. सरकारने पीएम आवास योजनेच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला हे नवीन नियम माहीत नसतील तर तुमचे या योजनेतील घर रद्द होऊ शकते. जर तुम्हाला पीएम आवास योजनेतील घर मिळाले असेल तर तुम्हाला त्या घरात पाच वर्षे राहणे बंधनकारक असणार आहे. अन्यथा तुमचे घर रद्द केले जाईल. दरम्यान, सध्या ज्या घरांना रजिस्टर्ड अॅग्रिमेंट टू लीज करून दिले जात आहे किंवा जे लोक हा अॅग्रिमेंट भविष्यात करतील, ते रजिस्ट्रीमध्ये नाहीत. (PM Awas Yojana govt made new rules regarding PM Housing)
पीएम आवास अंतर्गत नियमांमध्ये बदल
दरम्यान, तुम्ही पीएम आवास योजनेतील घरे वापरली आहेत की नाही हे सरकार पाच वर्षे पाहणार आहे. जर तुम्ही या घरांमघ्ये राहत असाल तरच या अॅग्रिमेंटला लीज डीडमध्ये बदलले जाईल. अन्यथा विकास प्राधिकरण तुमच्यासोबत केलेला अॅग्रिमेंटही संपुष्टात आणेल. यानंतर तुम्ही जमा केलेली रक्कम देखील परत केली जाणार नाही. म्हणजेच एकंदरीत या योजनेत होणारी हेराफेरी थांबेल.
अनेक अॅग्रिमेंट करायचे बाकी आहेत
कानपूर हे पहिले असे विकास प्राधिकरण आहे, जिथे लोकांना रजिस्टर्ड अॅग्रिमेंट टू लीजनुसार घरात राहण्याचे अधिकार दिले जात आहेत. पहिल्या टप्प्यात केडीएचे उपाध्यक्ष अरविंद सिंह यांच्या पुढाकाराने आयोजित शिबिरात 60 जणांसोबत अॅग्रिमेंट करण्यात आले आहे. यावेळी ते म्हणाले की, या आधारावर 10900 पेक्षा जास्त योजनेतील घरांचे अॅग्रिमेंट करणे बाकी आहे.
फ्री होल्ड होणार नाहीत फ्लॅट
या व्यतिरिक्त अटी आणि शर्तींनुसार, शहरी पीएम आवास योजनेअंतर्गत बांधलेले फ्लॅट कधीही फ्री होल्ड होणार नाहीत. पाच वर्षांनंतरही लोकांना लीजवर राहावे लागेल. जे पीएम आवास योजनेअंतर्गत घर भाड्याने घेत होते, ते आता जवळजवळ बंद होईल, त्यामुळे हे फायदेशीर ठरेल.
काय आहे नियम?
जर एखाद्या पीएम आवास योजनेतील लाभार्थ्याचा मृत्यू झाला, तर नियमानुसार, केवळ कुटुंबातील सदस्याला लीज हस्तांतरित केले जाईल. इतर कोणत्याही कुटुंबासोबत केडीए कोणतेही अॅग्रिमेंट करणार नाही. या अॅग्रिमेंटअंतर्गत लाभार्थ्यांना 5 वर्षे घरांचा वापर करावा लागेल. यानंतर घरांचे लीज दिले जाईल.