Join us  

PM Jan-Dhan Account : खूशखबर! जनधन खातेधारकांना मिळेल 1.3 लाख रुपयांचा लाभ; जाणून घ्या, सविस्तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2021 1:42 PM

PM Jan-Dhan Account : पंतप्रधान जनधन योजनेअंतर्गत (Pradhan Mantri Jan Dhan Yojana- PMJDY) ग्राहकांना अनेक प्रकारचे आर्थिक सहाय्य मिळेल.

नवी दिल्ली : जर तुम्ही देखील जनधन खाते (Jan Dhan Account) उघडण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारकडून जनधन खातंधारकांना 1.30 लाख रुपयांचा फायदा मिळेल. जर तुम्हीही याचा फायदा घेणार असाल तर आजच या योजनेचे रजिस्ट्रेशन करू शकता. पंतप्रधान जनधन योजनेअंतर्गत (Pradhan Mantri Jan Dhan Yojana- PMJDY) ग्राहकांना अनेक प्रकारचे आर्थिक सहाय्य मिळेल. जाणून घ्या, कशाप्रकारे तुम्ही 1.30 लाखांचा फायदा मिळवू शकता...

असा मिळेल 1.30 लाख रुपयांचा लाभपंतप्रधान जनधन योजनेअंतर्गत ज्यांनी खाते उघडले आहे, त्यांना 1.30 लाखापर्यंत लाभ मिळतो. यामध्ये अपघाती विमा मिळतो. खातेधारकाला 1,00,000 रुपयांचा अपघात विमा आणि 30,000 रुपयांचा जनरल विमा दिला जातो. अशा परिस्थितीत जर खातेदाराचा अपघात झाला तर 30,000 रुपये दिले जातात. या दुर्घटनेत खातेदाराचा मृत्यू झाल्यास एक लाख रुपये दिले जातात, म्हणजे एकूण 01.30 लाख रुपयांचा लाभ मिळतो.

कुणाला उघडता येईल खाते?>> भारताचा कुणीही नागरिक या योजनेअंतर्गत खाते उघडू शकतो.>> खाते उघडण्यासाठी 10 वर्षांची कमीतकमी वयोमर्यादा आहे. >> या योजनेअंतर्गत 10 वर्षांपेक्षा अधिक वय असणारा कोणताही पात्र भारतीय नागरिक कोणत्याही शाखेत जाऊन खाते उघडू शकतो. >> शिवाय, तुम्ही बँक मित्राच्या मदतीने देखील खाते उघडू शकता.

काय आहेत फायदे?>> या खात्यात जमा रकमेवर तुम्हाला व्याज मिळते.>> जर तुम्ही योजनेद्वारे खाते उघडणार असाल तर कमीतकमी शिल्लक (मिनिमम बॅलन्स) ठेवण्याची गरज नाही. >> या योजनेद्वारे 10 हजार रुपयांपर्यंत ओव्हरड्राफ्ट सुविधा मिळते.>> या योजनेचा लाभ 18 ते 65 वयोगटातील कोणतीही व्यक्ती घेऊ शकते.>> PMJDY चे असे खातेधारक ज्यांनी रुपे कार्ड सुविधा घेतली आहे त्यांना 2 लाखापर्यंत अपघाती विमा कव्हर मिळतो.

काय आहे जनधन खाते?पंतप्रधान जनधन योजना (PMJDY) हा सर्वात महत्वाकांक्षी वित्तीय प्रोग्राम आहे, जो बँकिंग / बचत आणि ठेवी खाती, पैसे, कर्ज, विमा, निवृत्तीवेतनपर्यंत प्रवेश सुनिश्चित करतो. हे खाते कोणत्याही बँक शाखा किंवा व्यवसाय प्रतिनिधी (बँक मित्र) आउटलेटवर उघडता येते. पीएमजेडीवाय खाते शून्य शिल्लक ठेवून उघडले जात आहे.

कसे उघडावे खाते?तुम्हाला तुमचे जनधन अकाउंट उघडायचे असेल तर जवळच्या बँकेत जा. तिथे जनधन अकाऊंटचा फॉर्म भरा. त्याठिकाणी तुमची आवश्यक सर्व माहिती द्या. अर्ज करणाऱ्या व्यक्तीला नाव, मोबाईल नंबर, बँकेच्या ब्रांचचे नाव, पत्ता, नॉमिनी (वारसदार), व्यवसाय / रोजगार, वार्षिक उत्पन्न, घरातील सदस्य संख्या, एसएसए कोड किंवा वार्ड नंबर, व्हिलेज कोड (गावाचा नंबर) याबद्दल माहिती द्यावी लागेल. याचबरोबर, PMJDY च्या वेबसाईटवरील माहितीनुसार, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड नंबर, मतदान कार्ड, राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांची सही असलेले मनरेगा जॉब कार्डच्या आधारे तुम्ही तुमचे जनधन अकाउंट उघडू शकता. भारतात राहणारा कोणताही नागरिक ज्याचे वय 10 वर्षांपेक्षा अधिक आहे ते जन धन खाते उघडू शकतो.

टॅग्स :बँकपंतप्रधानपैसा