Lokmat Money > बिझनेस न्यूज > पीएम जनधन योजनेला १० वर्षे पूर्ण, आतापर्यंत ५३ कोटी खात्यांमध्ये २ लाख कोटी रुपये जमा 

पीएम जनधन योजनेला १० वर्षे पूर्ण, आतापर्यंत ५३ कोटी खात्यांमध्ये २ लाख कोटी रुपये जमा 

PM Jan Dhan Yojana : नरेंद्र मोदी म्हणाले की, गेल्या दशकात ५३ कोटींहून अधिक जनधन खाती उघडण्यात आली आहेत. या खात्यांमध्ये २ लाख, ३१ हजार कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 02:05 PM2024-08-28T14:05:22+5:302024-08-28T14:06:38+5:30

PM Jan Dhan Yojana : नरेंद्र मोदी म्हणाले की, गेल्या दशकात ५३ कोटींहून अधिक जनधन खाती उघडण्यात आली आहेत. या खात्यांमध्ये २ लाख, ३१ हजार कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत.

pm jan dhan yojana completed ten years pm narendra modi congratulates women youth marginalized communities, 53 crore jan dhan accounts in the country | पीएम जनधन योजनेला १० वर्षे पूर्ण, आतापर्यंत ५३ कोटी खात्यांमध्ये २ लाख कोटी रुपये जमा 

पीएम जनधन योजनेला १० वर्षे पूर्ण, आतापर्यंत ५३ कोटी खात्यांमध्ये २ लाख कोटी रुपये जमा 

PM Jan Dhan Yojana : नवी दिल्ली : प्रधानमंत्री जन धन योजना म्हणजेच PMJDY ला आज दहा वर्षे पूर्ण झाली. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांचे अभिनंदन केले. तसेच, या योजनेंतर्गत आतापर्यंत किती खाती उघडली आहेत, याचीही माहिती सोशल मीडियावर दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, गेल्या दशकात ५३ कोटींहून अधिक जनधन खाती उघडण्यात आली आहेत. या खात्यांमध्ये २ लाख, ३१ हजार कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत.

आज आपण एक खास प्रसंग साजरा करत आहोत. #10YearsOfJanDhan. सर्व लाभार्थ्यांचे अभिनंदन व ही योजना यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतलेल्या सर्वांचे अभिनंदन, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मीडियावर लिहिले आहे. तसेच, जन धन योजना आर्थिक समावेशनाला चालना देण्यासाठी समर्पित आहे. कोट्यवधी लोकांना, विशेषत: महिला, तरुण आणि समाजातील उपेक्षित घटकांना सन्मान देण्यास ती सक्षम आहे, असेही नरेंद्र मोदींनी म्हटले आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २८ ऑगस्ट २०१४ रोजी ही योजना सुरू केली. गेल्या दहा वर्षांत या योजनेत सहभागी होण्यासाठी देशभरात प्रचंड उत्साह असल्याची माहिती अर्थ मंत्रालयाने दिली आहे. तसेच, हा जगातील सर्वात मोठा आर्थिक समावेशन कार्यक्रम बनला आहे. यामध्ये २.३ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. हे असे खाते आहे, ज्यामध्ये किमान शिल्लक म्हणजेच मिनिमम बॅलन्स आवश्यक नाही.

या योजनेद्वारे पुरुषांपेक्षा महिलांची जास्त खाती 
सरकारने म्हटले आहे की, ५३ कोटींहून अधिक खात्यांपैकी ५५.६ टक्के खाती महिलांची आहेत. म्हणजेच या खात्यात सहभागी होणाऱ्यांची संख्या पुरुषांपेक्षा महिलांची जास्त आहे. तसेच, शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण आणि शहरी भागात खातेदारांची संख्या अधिक आहे. ५३ कोटी लोकांपैकी सुमारे ३५ कोटी लोक खेडे आणि शहरांतील आहेत.
 

Web Title: pm jan dhan yojana completed ten years pm narendra modi congratulates women youth marginalized communities, 53 crore jan dhan accounts in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.