Lokmat Money > बिझनेस न्यूज > PM Kisan : शेतकऱ्यांसाठी खुशखबर! लवकरच पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता मिळणार, जाणून घ्या सविस्तर...

PM Kisan : शेतकऱ्यांसाठी खुशखबर! लवकरच पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता मिळणार, जाणून घ्या सविस्तर...

PM Kisan : 11 व्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी, तुम्ही ताबडतोब ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2022 02:34 PM2022-02-04T14:34:59+5:302022-02-04T14:35:28+5:30

PM Kisan : 11 व्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी, तुम्ही ताबडतोब ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे.

pm kisan 11th installment rupees 2000 to be released on this date check | PM Kisan : शेतकऱ्यांसाठी खुशखबर! लवकरच पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता मिळणार, जाणून घ्या सविस्तर...

PM Kisan : शेतकऱ्यांसाठी खुशखबर! लवकरच पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता मिळणार, जाणून घ्या सविस्तर...

नवी दिल्ली : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत (PM Kisan Yojana) केंद्र सरकारकडून देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी 6 हजार रुपये ट्रान्सफर केले जातात. नवीन वर्षात, पीएम किसान योजनेअंतर्गत, केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 10 व्या हप्त्याचे 2000 रुपये ट्रान्सफर केले आहेत. मात्र, सध्या काही शेतकरी असे आहेत की, जे केंद्र सरकारकडून सुरू असलेल्या या सुविधेचा लाभ घेऊ शकत नाहीत. जर तुम्ही देखील त्यापैकी एक असाल तर तुमच्या माहितीसाठी सरकार लवकरच 11 व्या हप्त्यासाठी पैसे पाठवणार आहे. 11 व्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी, तुम्ही ताबडतोब ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे.

या महिन्यात जमा होतो हप्ता
प्रत्येक आर्थिक वर्षात, पहिला हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलै, दुसरा हप्ता 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर आणि तिसरा हप्ता 1 डिसेंबर ते 31 मार्च या कालावधीत येतो. हा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतो.

ऑनलाइन नोंदणी करण्याची प्रक्रिया
या योजनेत नोंदणी करणे अगदी सोपे आहे. ही प्रक्रिया तुम्ही घरबसल्या ऑनलाइन पूर्ण करू शकता. याशिवाय तुम्ही या योजनेसाठी पंचायत सचिव किंवा पटवारी किंवा स्थानिक कॉमन सर्व्हिस सेंटरद्वारे अर्ज करू शकता. तसेच, तुम्ही या योजनेसाठी स्वतः देखील नोंदणी करू शकता.

अशा प्रकारे करू शकता नोंदणी
>> तुम्हाला पहिल्यांदा पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
>> आता Farmers Corner वर जा.
>> येथे तुम्हाला ‘New Farmer Registration’या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
>> यानंतर तुम्हाला आधार क्रमांक टाकावा लागेल.
>> यासोबतच कॅप्चा कोड टाकून राज्य निवडावे लागेल आणि त्यानंतर या प्रोसेसला पुढे करावे लागेल.
>> या फॉर्ममध्ये तुम्हाला तुमची संपूर्ण वैयक्तिक माहिती भरावी लागेल.
>> यासोबतच बँक खात्याचा तपशील आणि शेतीशी संबंधित माहिती भरावी लागणार आहे.

योजनेचे लाभार्थी असाल तर असे करा तुमचे नाव चेक
पीएम किसान योजनेसाठी शेतकरी ऑनलाईन अर्ज (नोंदणी) करू शकतात. यासाठी शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी किंवा त्यामध्ये काही बदल करण्यासाठी पीएम किसान योजनेच्या वेबसाइटवरून करता येणार आहे. यासाठी प्रथम www.pmkisan.gov.in या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. वेबसाइटच्या होम पेजवर, फार्मर्स कॉर्नर उजव्या बाजूला मोठ्या अक्षरे लिहिलेले आहे. आपले नाव सूचीमध्ये आहे की नाही हे आपण पाहू इच्छित असल्यास आपल्याला लाभार्थी यादी / Beneficiary list वर क्लिक करावे लागेल. यानंतर आपण आपले नाव राज्य, जिल्हा, उपजिल्हा, गट आणि गाव यांचे नाव भरून तपासू शकता.

...यामुळे पैसे खात्यात पोहोचत नाहीत
काही वेळा सरकारकडून खात्यात पैसे ट्रान्सफर केले जातात, पण ते शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचत नाहीत. याचे मुख्य कारण तुमचा आधार क्रमांक किंवा बँक खाते क्रमांकात काही तरी चूक असण्याची शक्यता असते.

Web Title: pm kisan 11th installment rupees 2000 to be released on this date check

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.