Join us

PM Kisan : या एका चुकीमुळं 4 कोटी शेतकऱ्यांचं मोठं नुकसान! ल‍िस्‍टमध्ये आपलं नाव तर नाही?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2022 9:59 AM

PM Kisan 12th Installment: 12 व्या हप्त्याच्या स्वरुपात, पीएम मोदींनी 16 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्फर केले आहेत.

पंतप्रधान किसान सन्मान निधीचा 12 वा हप्ता सोमवारी (17 ऑक्टोबर) पीएम मोदींनी डीबीटीद्वारे जारी केला. वर्षातून तीन वेळा मिळणारी 2-2 हजार रुपयांची ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर ट्रान्फर केली जाते. 12 व्या हप्त्याच्या स्वरुपात, पीएम मोदींनी 16 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्फर केले आहेत. याचबरोबर या महत्त्वाकांक्षी योजनेंतर्गत सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत 2 लाख कोटींहून अधिक रुपये जमा केल्याचेही सांगितले.

11व्या हप्त्यात ट्रान्सफर करण्यात आले 21 हजार कोटी -सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधीत कुठल्याही प्रकारचा घोटाळा रोखण्यासाठी ई-केवायसी (e-KYC) अनिवार्य केली आहे. मात्र, वेळेच्या आत ई-केवायसी (e-KYC) न केल्याने कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यात आलेले नाहीत. एका आकडेवारी नुसार, जवळपास अडीच कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपयांचा हप्ता जमा झालेला नाही. तत्पूर्वी 11व्या हप्त्याच्या स्वरुपात सरकारकडून तब्बल 21 हजार कोटी रुपयांहूनही अधिकची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर करण्यात आली होती.

जारी करण्यात आली 16 हजार कोटींची रक्कम -सरकारने 17 ऑक्टोबरला 12व्या हप्त्याच्या स्वरुपात 16 हजार कोटी रुपये जारी केले आहेत. अर्थात, 11व्या हप्त्याच्या तुलनेत 12व्या हप्त्यात 5 हजार कोटी रुपये कमी ट्रान्फर करण्यात आले आहेत. याचा थेट अर्थ असा, की यावेळी 2.50 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात हप्ता पाठवण्यात आलेला नाही. पीएम क‍िसानच्या आध‍िकृत पोर्टलवर 12 कोटीहून अधिक शेतकऱ्यांचे रज‍िस्‍ट्रेशन आहे आणि 16 हजार कोटींचा अर्थ आठ कोटी शेतकऱ्यांनाच पैसे मिळाले आहेत. याचाच अर्थ असा की तब्बल चार कोटी शेतकऱ्यांना यावेळी हप्ता मिळालेला नाही.

म्हत्वाचे म्हणजे, पीएम किसान योजनेच्या निश्चित करण्यात आलेल्या नियमांनुसार, दरवर्षी 5% लाभार्थ्यांची भौतिक पडताळणी केली जाते. एप्रिल ते जुलै या कालावधीत जारी होणारा 11 वा हप्ता आतापर्यंत एकूण 11.26 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यांत जमा ट्रान्सफर करण्यात आला आहे.

टॅग्स :नरेंद्र मोदीशेतकरीप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना