Lokmat Money > बिझनेस न्यूज > या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार 15 लाख रुपयांची मदत, जाणून घ्या संपूर्ण माहिती...

या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार 15 लाख रुपयांची मदत, जाणून घ्या संपूर्ण माहिती...

शेतकऱ्यांना व्यावसायिकदृष्ट्या बळकट करण्यासाठी योजना राबवली जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 07:02 PM2024-10-14T19:02:34+5:302024-10-14T19:02:43+5:30

शेतकऱ्यांना व्यावसायिकदृष्ट्या बळकट करण्यासाठी योजना राबवली जात आहे.

PM Kisan FPO Yojana: Farmers will get help of Rs 15 lakh under this scheme, know complete information | या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार 15 लाख रुपयांची मदत, जाणून घ्या संपूर्ण माहिती...

या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार 15 लाख रुपयांची मदत, जाणून घ्या संपूर्ण माहिती...

PM Kisan FPO Yojana :केंद्र सरकार देशातील नागरिकांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवते. देशातील निम्म्याहून अधिक लोकसंख्या अजूनही शेतीतून आपला उदरनिर्वाह करते, त्यामुळे देशातील शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार विशेष लक्ष देते. सरकार शेतकऱ्यांसाठीही अनेक योजना राबवत आहे, ज्याचा देशातील करोडो शेतकऱ्यांना फायदा होतो. आम्ही तुम्हाला अशाच एका योजनेबद्दल सांगणार आहोत, ज्यात शेतकऱ्यांना मोठी आर्थिक मदत दिली जाते.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, ही सरकारने शेतकऱ्यांसाठी चालवलेली सर्वात लोकप्रिय योजना आहे. यामध्ये शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपये दिले जातात. याशिवाय सरकार शेतकऱ्यांसाठी आणखी एक योजना राबवत आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना व्यवसाय करण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते. ही योजना काय आहे आणि या योजनेसाठी कोणी अर्ज कसा करू शकता, हे जाणून घ्या...

पीएम किसान एफपीओ योजना
शेतकऱ्यांना व्यावसायिकदृष्ट्या बळकट करण्यासाठी आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी भारत सरकारने PM किसान FPO योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत 11 शेतकऱ्यांच्या गटाला, म्हणजेच शेतकरी उत्पादक संघटना (FPO) यांना शेतीशी संबंधित व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारकडून 15 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.

या योजनेच्या माध्यमातून सरकारला शेतकरी उत्पादक संघटनेच्या मदतीने शेती क्षेत्र अधिक बळकट करायचे आहे. एकट्या शेतकऱ्याला या योजनेचा लाभ घेता येत नाही. त्याला या योजनेअंतर्गत लाभ घ्यायचा असेल, तर शेतकरी उत्पादक संघटना (FPO) स्थापन करावी लागेल. शेतकऱ्यांच्या या संघटनेत किमान 11 जण असणे आवश्यक आहे, तरच तुम्हाला या सरकारी योजनेचा लाभ मिळू शकेल.

अर्ज कसा करायचा
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता. यासाठी तुम्हाला योजनेच्या अधिकृत वेबसाइट https://www.enam.gov.in वर जावे लागेल. यानंतर, होमपेजवर नोंदणी केल्यानंतर तुम्हाला लॉग इन करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला विनंती केलेली सर्व माहिती टाकावी लागेल आणि फॉर्म सबमिट करावा लागेल. योजनेत नोंदणीसाठी तुम्हाला FPO चे MD किंवा CEO किंवा व्यवस्थापक यांचे नाव, पत्ता, ई-मेल आयडी आणि संपर्क क्रमांक द्यावा लागेल.

Web Title: PM Kisan FPO Yojana: Farmers will get help of Rs 15 lakh under this scheme, know complete information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.