Lokmat Money > बिझनेस न्यूज > PM Kisan Yojana : मोदी सरकार शेतकऱ्यांना देतेय 15 लाख रुपये, लगेच अर्ज करा; अशी आहे पद्धत

PM Kisan Yojana : मोदी सरकार शेतकऱ्यांना देतेय 15 लाख रुपये, लगेच अर्ज करा; अशी आहे पद्धत

केंद्रातील मोदी सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी आणि त्यांच्या डोक्यावरील कर्ज कमी करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. आता सरकार शेतकऱ्यांना नवीन शेती व्यवसाय सुरू करण्यासाठी 15 लाख रुपये देत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2022 06:41 PM2022-10-27T18:41:23+5:302022-10-27T18:42:03+5:30

केंद्रातील मोदी सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी आणि त्यांच्या डोक्यावरील कर्ज कमी करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. आता सरकार शेतकऱ्यांना नवीन शेती व्यवसाय सुरू करण्यासाठी 15 लाख रुपये देत आहे.

pm kisan fpo yojana govt will give rs 15 lakh to help farmers know how to apply | PM Kisan Yojana : मोदी सरकार शेतकऱ्यांना देतेय 15 लाख रुपये, लगेच अर्ज करा; अशी आहे पद्धत

PM Kisan Yojana : मोदी सरकार शेतकऱ्यांना देतेय 15 लाख रुपये, लगेच अर्ज करा; अशी आहे पद्धत

जर आपण किसान योजनेचे लाभार्थी असाल तर आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रातील मोदी सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी आणि त्यांच्या डोक्यावरील कर्ज कमी करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. आता सरकार शेतकऱ्यांना नवीन शेती व्यवसाय सुरू करण्यासाठी 15 लाख रुपये देत आहे. तर जाणून घ्या, आपण या योजनेचा लाभ कशा पद्धतीने घेऊ शकता...

शेतकऱ्यांना मिळणार 15 लाख रुपये - 
शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून सरकारने 'पीएम किसान एफपीओ योजना' (PM Kisan FPO Yojana) सुरू केली आहे. या योजनेंतर्गत फॉर्मर्स प्रोड्यूसर ऑर्गेनाइजेशनला 15 लाख रुपये दिले जाणार आहेत. नवीन कृषी व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार देशभरातील शेतकऱ्यांना ही आर्थिक मदत करेल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी 11 शेतकऱ्यांना एकत्रित येऊन एक संस्था अथवा कंपनी स्थापन करावी लागेल. एवढेच नाही तर, यामुळे शेतकऱ्यांना कृषी उपकरणे, खते, बी-बियाणे आणि औषध खरेदी करणेही सोपे होईल.

असा करा अर्ज -
- सर्वप्रथम राष्ट्रीय कृषी बाजारच्या आधिकृत वेबसाइटवर जा.  
- आता आपल्यासमोर होम पेज ओपन होईल. 
- आता होम पेजवर एफपीओ या पर्यायावर क्लिक करा. 
- यानंतर 'रजिस्ट्रेशन' नावाच्या पर्यायावर क्लिक करा.
- आता आपल्यासमोर रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होईल. 
- आता आपण फॉर्ममध्ये मागण्यात आलेली माहिती भरा.
- यानंतर, पासबुक अथवा कँसल चेक अथवा आयडी प्रूफ स्कॅन करून अपलोड करा. 
- यानंतर सब्मिट म्हणा.

असं करा लॉग इन -
- जर आपल्याला लॉगिन करायचे असेल, तर सर्वात पहिले राष्ट्रीय कृषी बाजारच्या आधिकृत वेबसाइटवर जा. 
- आता आपल्यासमोर होम पेज ओपन होईल.
- यानंतर एफपीओ या पर्यायावर क्लिक करा.
- यानंतर लॉग इन नावाच्या पर्यायावर क्लिक करा. 
- यानंतर आपल्यासमोर लॉग इन फॉर्म ओपन होईल. 
- आता यात युजरनेम, पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाका. 
- यानंतर आपण लॉग इन व्हाल.

Web Title: pm kisan fpo yojana govt will give rs 15 lakh to help farmers know how to apply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.