नवी दिल्ली : पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM kisan Samman Nidhi) योजनेअंतर्गत लाभ देणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच २००० रुपयांच्या ऐवजी ४००० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात येऊ शकतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मोदी सरकार लवकरच लाभार्थी शेतकऱ्यांना गिफ्ट देऊ शकते.
रिपोर्टनुसार, केंद्र सरकार (Central Government) पंतप्रधान किसान सन्मान निधी रकमेत दुप्पट करण्याचा विचार करीत आहे. असे झाल्यास शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांऐवजी तीन हप्त्यांमध्ये १२ हजार रुपये मिळू शकतात. मीडिया रिपोर्टनुसार, बिहारचे कृषीमंत्री अमरेंद्र प्रताप सिंह यांनी अलीकडेच केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण सीतारमण (FM niramala sitharaman) यांची दिल्लीत भेट घेऊन पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत रक्कम दुप्पट करण्यासंदर्भात चर्चा केली. मात्र, अद्याप यावर कोणताही निर्णय झालेला नाही.
कधी मिळतो हप्ता?
पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी ६,००० रुपये पाठविले जाते. हे पैसे ३ हप्त्यांमध्ये पाठवले जातात. प्रत्येक हप्त्यात दोन हजार रुपये पाठवले आहेत. दर ४ महिन्यांनी एक हप्ता येतो. PM Kisan ने दिलेल्या माहितीनुसार, या योजनेचा पहिला हप्ता १ डिसेंबर ते ३१ मार्च दरम्यान येतो. दुसरा हप्ता १ एप्रिल ते ३१ जुलै दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यात पाठविला जातो. तर तिसरा हप्ता १ ऑगस्ट ते ३० नोव्हेंबर दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर केला जातो.
२०१९ मध्ये ही योजना सुरू
मोदी सरकारने २६ फेब्रुवारी २०१९ रोजी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत सरकार छोट्या शेतकऱ्यांना तीन हप्त्यांमध्ये दरवर्षी ६००० रुपये देते.
या योजनेच्या लिस्टमध्ये तुमचे नाव असे तपासा :
१) सर्वात आधी तुम्हाला पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in ला भेट द्यावी लागेल. २) वेबसाइटच्या होम पेजवर तुम्हाला Farmers Corner चा ऑप्शन दिसेल.
३) Farmers Corner सेक्शनमध्ये तुम्हाला Beneficiaries List च्या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल.
४) त्यानंतर तुम्हाला ड्रॉपडाऊन लिस्टमधून राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडावे लागेल.
५) यानंतर, तुम्हाला Get Report वर क्लिक करावे लागेल. त्यानंतर, लाभार्थ्यांची संपूर्ण यादी दिसून येईल, ज्यामध्ये तुम्ही तुमचे नाव तपासू शकता.