नवी दिल्ली : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (PM-KISAN) अंतर्गत केंद्रातील मोदी सरकार जवळपास 10 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 9 वा हप्ता जारी करणार आहेत. केंद्र सरकारने एका निवेदनात म्हटले आहे की, 9 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 11 वाजता, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ऑनलाइन माध्यमातून 9 व्या हप्त्याची 2000 रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर करतील. (pm narendra modi will release the 9th instalment of pm-kisan on 9th august)
याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला होता. या आठव्या हप्त्यादरम्यान, पश्चिम बंगालच्या शेतकऱ्यांना पहिल्यांदा पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनाची रक्कम मिळाली होती. दरम्यान, 5 ऑगस्ट रोजी उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 रुपये 9 व्या हप्त्याप्रमाणे पाठवले जातील, तर 7 ऑगस्ट रोजी मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवले जातील.
कल्पना तिच्या यशाचे श्रेय तिच्या पालकांना आणि शिक्षकांना देते. #upsc#ISS#educationhttps://t.co/Ft0nnPOsl4
— Lokmat (@MiLOKMAT) August 4, 2021
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत 8 हप्ते पाठवण्यात आले आहेत. म्हणजेच आतापर्यंत केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यावर 16,000 रुपये पाठवले आहेत. दरवर्षी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत मोदी सरकार शेतकऱ्यांना 2000-2000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये 6000 रुपये देते. त्याअंतर्गत दर वर्षाचा पहिला हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलै, दुसरा हप्ता 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर या कालावधीत आणि तिसरा हप्ता 1 डिसेंबर ते 31 मार्च या कालावधीत दिला जातो.
मराठा आरक्षण हा राजकारणाचा विषय नाही. महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्ष आणि केंद्र व राज्य सरकारच्या समन्वयातूनच हा प्रश्न मार्गी लागू शकतो, असे अशोक चव्हाण म्हणाले. #AshokChavan#MarathaReservationhttps://t.co/YVkXaJ3clJ@AshokChavanINC@INCMaharashtra
— Lokmat (@MiLOKMAT) August 4, 2021
या योजनेच्या लिस्टमध्ये तुमचे नाव असे तपासा :
१) सर्वात आधी तुम्हाला पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in ला भेट द्यावी लागेल. २) वेबसाइटच्या होम पेजवर तुम्हाला Farmers Corner चा ऑप्शन दिसेल.
३) Farmers Corner सेक्शनमध्ये तुम्हाला Beneficiaries List च्या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल.
४) त्यानंतर तुम्हाला ड्रॉपडाऊन लिस्टमधून राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडावे लागेल.
५) यानंतर, तुम्हाला Get Report वर क्लिक करावे लागेल. त्यानंतर, लाभार्थ्यांची संपूर्ण यादी दिसून येईल, ज्यामध्ये तुम्ही तुमचे नाव तपासू शकता.