PM Kisan Samman Nidhi : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन(Nirmala Sitharaman) येत्या 23 जुलै रोजी मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी सरकार मोठी घोषणा करणार असल्याची माहिती समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पीएम किसान सन्मान निधीतील (PM Kisan Samman Nidhi) रक्कम 30 टक्क्यांनी वाढवून सुमारे 80,000 कोटी रुपये केले जाणार आहेत.
अंतरिम अर्थसंकल्पात सरकारने पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी 60,000 कोटी रुपयांची तरतूद केली होती, ज्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला 6,000 रुपये वार्षिक भत्ता मिळणार होता. आता मिळालेल्या माहितीनुसार, जूनच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या बैठकीत कृषी प्रतिनिधींनी अर्थमंत्र्यांना या योजनेतील रक्कम प्रति शेतकरी 8,000 रुपये करण्याची मागणी केली आहे. त्यानुसार या योजनेतील रक्कम वाढवली जाणार आहे.
टॅक्सद्वारे एवढा पैसा गोळा होण्याचा अंदाज1 फेब्रुवारी 2024 रोजी अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला, ज्यामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थव्यवस्थेतील उत्पन्न आणि खर्चामुळे FY25 साठी ज्यादा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कराचा अंदाज लावला होता. केंद्राने आर्थिक वर्ष 2025 मध्ये प्रत्यक्ष करातून 21.99 लाख कोटी रुपये आणि अप्रत्यक्ष करातून 16.31 लाख कोटी रुपये गोळा करण्याची योजना आखली आहे.