PM Kisan Samman Nidhi : देशभरातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधीचा 17वा हप्ता लवकरच जमा होणार आहे. केंद्रात एनडीए सरकारची स्थापना झाल्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वप्रथम, शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान निधीच्या पुढील हप्त्याच्या फाइलवर स्वाक्षरी केली होती. मात्र, हा हप्ता केव्हा जमा होणार? याची तारीख समोर आलेली नव्हती. पण आता 18 जून 2024 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार असल्याचे समजते.
वाराणसीतून जारी होणार PM किसान योजनेचा 17 वा हप्ता -पीएम मोदी 18 जूनला वाराणसीमध्ये असतील. ते तेथूनच पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता जारी करतील. केंद्र सरकारची ही आर्थिक मदद डायरेक्ट बेनेफिट ट्रांसफर अर्थात डीबीटीच्या माध्यमाने देशातील 9.3 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा होईल.
प्रत्येक पात्र शेतकऱ्याच्या खात्यावर 2000 रुपये ट्रान्सफर होतील. महत्वाचे म्हणजे, 17व्या हप्त्याच्या माध्यमाने केंद्र सरकार यावेळी एकूण 20 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पाठवेल.
लिस्टमध्ये असं चेक करा आपलं नाव -- लिस्टमध्ये नाव चेक करण्यासाठी शेतकऱ्यांनी सर्वप्रथम पीएम किसानची अधिकृत वेबसाइट www.pmkisan.gov.in वर जावे.- आता होमपेजवर 'लाभार्थी लिस्ट' च्या टॅबवर क्लिक करा.- यानंतर, डिटेल्स सिलेक्ट करा. जसे, राज्य, जिल्हा, गांव आदी...- यानंतर रिपोर्ट टॅबवर क्लिक करा.- यानंतर आपल्याला लाभार्थी लिस्ट दिसेल. यात आपण आपले नाव चेक करू शकता.