नवी दिल्ली : देशातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या (PM Kisan Samman Nidhi) रकमेच्या प्रतीक्षेत असलेल्या करोडो लाभार्थ्यांना मे महिन्याच्या सुरुवातीला चांगली बातमी मिळू शकते. येत्या 10-15 दिवसांत, सरकार पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर करू शकते.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पीएम किसान सन्मान निधी योजनेचे पैसे 3 मे रोजी अक्षय्य तृतीयेच्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर केले जाऊ शकतात. राज्य सरकारांनी आरएफटी साइन (RFT Sign) केली आहे. आरएफटी म्हणजे रिक्वेस्ट फॉर ट्रान्सफर. यानंतर शेतकऱ्यांना 11 वा हप्ता लवकर मिळेल, अशी अपेक्षा वाढली आहे.
तुमचे स्टेटस तपासा...दरम्यान, तुम्ही अजून तुमचे स्टेटस पाहिले नसेल, तर लवकरच तपासा. जर स्टेटसमध्ये RFT Sign by state दिसत असेल तर याचा अर्थ तुम्ही दिलेली माहिती तपासली गेली आहे. ती आता पुढे पाठवण्यात आला आहे. जर FTO is Generated and Payment confirmation is Pending असे तुमच्या स्टेटसमध्ये लिहिलेले असेल, तर याचा अर्थ सरकारने तुमच्या माहितीची पुष्टी केली आहे.
म्हणजेच 11व्या हप्त्यासाठी आता तुम्हाला जास्त वाट पाहावी लागणार नाही. लवकरच तुमच्या खात्यात 2,000 रुपये ट्रान्सफर केले जातील. दरम्यान, पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत केंद्र सरकार नोंदणीकृत शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपये देते. ही रक्कम तीन हप्त्यांमध्ये दिली जाते. प्रत्येक हप्त्यात 2,000 दिले जातात. आत्तापर्यंत या योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात 10 हप्ते ट्रान्सफर करण्यात आले आहेत.