Join us  

मोदी सरकार शेतकऱ्यांना देतंय 15 लाख रुपये, त्वरित अर्ज करा; कसे ते जाणून घ्या?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2022 8:15 PM

PM Kisan FPO Yojana : सरकार शेतकऱ्यांना नवीन शेती व्यवसाय सुरू करण्यासाठी 15 लाख रुपये देत आहे. तुम्ही या योजनेचा लाभ कसा घेऊ शकता? याबाबत जाणून घ्या...

नवी दिल्ली : तुम्हालाही किसान योजनेचा लाभ मिळत असेल, तर आता तुमच्यासाठी आणखी एक मोठी बातमी आहे. दरम्यान, केंद्र सरकार  (Central Government) शेतकऱ्यांवर (Farmers)मेहेरबान आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे आणि त्यांच्या कर्जाचा बोजा कमी व्हावा, यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. आता सरकार शेतकऱ्यांना नवीन शेती व्यवसाय सुरू करण्यासाठी 15 लाख रुपये देत आहे. तुम्ही या योजनेचा लाभ कसा घेऊ शकता? याबाबत जाणून घ्या...

शेतकऱ्यांना मिळतील 15 लाख रुपये शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीसाठी सरकारने 'पीएम किसान एफपीओ योजना' (PM Kisan FPO Yojana) योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत शेतकरी उत्पादक संघटनेला 15 लाख रुपये दिले जाणार आहेत. नवीन कृषी व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार देशभरातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी 11 शेतकऱ्यांना मिळून एक संघटना किंवा कंपनी स्थापन करावी लागणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना कृषी उपकरणे किंवा खते, बी-बियाणे किंवा औषधे खरेदी करणेही सोपे होईल.

असा करा अर्ज...- सर्वात आधी राष्ट्रीय कृषी बाजाराच्या अधिकृत वेबसाइटवर जा.- आता तुमच्या समोर होम पेज ओपन होईल.- आता होम पेजवर FPO च्या पर्यायावर क्लिक करा.- यानंतर तुम्ही 'रजिस्ट्रेशन' या पर्यायावर क्लिक करा.- आता तुमच्या समोर रजिस्ट्रेशन फॉर्म उघडेल.- या फॉर्ममध्ये विचारलेली माहिती भरा.- यानंतर, तुम्ही पासबुक किंवा चेक आणि आयडी प्रूफला  स्कॅन करून अपलोड करा.- आता तुम्ही सबमिट पर्यायावर क्लिक करा.

असे करा लॉग इन- तुम्हाला लॉग इन करायचे असल्यास, सर्वात आधी राष्ट्रीय कृषी बाजाराच्या अधिकृत वेबसाइटवर जा.- आता तुमच्या समोर होम पेज ओपन होईल.- यानंतर तुम्ही एफपीओच्या पर्यायावर क्लिक करा.- आता तुम्ही लॉगिनच्या पर्यायावर क्लिक करा.- यानंतर तुमच्यासमोर लॉगिन फॉर्म उघडेल.- आता त्यात युजरनेम, पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाका.-  यानंतर तुम्ही लॉग इन कराल.

टॅग्स :प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाशेतकरी