Lokmat Money > बिझनेस न्यूज > 'पीएम किसान सन्मान निधी'च्या 16व्या हप्त्याचे वाटप; तुम्हाला मिळाला का? असे करा चेक...

'पीएम किसान सन्मान निधी'च्या 16व्या हप्त्याचे वाटप; तुम्हाला मिळाला का? असे करा चेक...

आज पीएम मोदींनी देशातील 9 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 'पीएम किसान सन्मान निधी' योजनेच्या 16व्या हप्त्याचे वाटप केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2024 08:20 PM2024-02-28T20:20:39+5:302024-02-28T20:21:47+5:30

आज पीएम मोदींनी देशातील 9 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 'पीएम किसान सन्मान निधी' योजनेच्या 16व्या हप्त्याचे वाटप केले.

PM Kisan Yojana: Allocation of 16th installment of 'PM Kisan Samman' fund; Check like this | 'पीएम किसान सन्मान निधी'च्या 16व्या हप्त्याचे वाटप; तुम्हाला मिळाला का? असे करा चेक...

'पीएम किसान सन्मान निधी'च्या 16व्या हप्त्याचे वाटप; तुम्हाला मिळाला का? असे करा चेक...

PM Kisan Yojana 16th installment, PM Kisan status check 2024: पीएम मोदी ने PM Kisan Samman Nidhi Yojana की 16वीं किस्त का वितरण कर दिया है. इस किस्त में किसानों के खातों में 21,000 करोड़ रुपये से अधिक की राशि हस्तांतरित हुई, जिससे लगभग 9 करोड़ से ज्यादा किसान परिवारों को तीन लाख करोड़ रुपये से ज्यादा की रकम मिलेगी.

PM Kisan Yojana 16th installment: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी(दि.28) शेतकऱ्यांसाठी चालवली जाणाऱ्या 'पीएम किसान सन्मान निधी' योजनेच्या 16व्या हप्त्याचे वाटप केले. या हप्त्यात 21,000 कोटी रुपयांहून अधिकची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित करण्यात आली, ज्याचा फायदा देशातील 9 कोटीहून अधिक शेतकरी कुटुंबांना होणार आहे. पंतप्रधानांनी यवतमाळमधील कार्यक्रमातून हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केले.

पीएम किसान योजनेची पाच वर्षे पूर्ण 
केंद्र सरकारच्या या योजनेला 5 वर्षे पूर्ण झाली आहेत आणि PM किसान pmkisan.gov.in च्या अधिकृत वेबसाइटनुसार, आतापर्यंत या योजनेअंतर्गत 11 कोटी शेतकऱ्यांना 2.80 लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम देण्यात आली आहे. योजनेअंतर्गत, केंद्र सरकार पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दर चार महिन्यांनी ₹ 6000 ची रक्कम तीन समान हप्त्यांमध्ये हस्तांतरित करते आणि आतापर्यंत सरकारने शेतकऱ्यांना 15 हप्ते जारी केले आहेत. देशभरातील जमीनधारक शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आर्थिक सहाय्य म्हणून PM किसान योजना फेब्रुवारी 2019 मध्ये सुरू करण्यात आली होती. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी 6,000 रुपये तीन समान हप्त्यांमध्ये हस्तांतरित केले जातात.

तुमच्या खात्यात पैसे आले का?
ज्या शेतकऱ्यांनी पीएम किसान लाभार्थी म्हणून 16व्या हप्त्यासाठी अर्ज केला आहे, त्यांच्या खात्यात या थेट पैसे येतील. तुम्ही सुद्धा PM किसान लाभार्थी असाल, तर लाभार्थी स्थिती तपासून तुमच्या खात्यात पैसे आले आहेत की नाही, हे तुम्ही पाहू शकता.

अशी आहे प्रोसेस...

  • सर्वप्रथम पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जा - https://pmkisan.gov.in/
  • येथे होमपेजवर 'नो युवर स्टेटस' या पर्यायावर क्लिक करा.
  • आता तुमच्या समोर एक पेज उघडेल, जिथे तुम्ही तुमचा रजिस्ट्रेशन नंबर, मोबाईल नंबर आणि कॅप्चा आणि OTP टाकाल.
  • यानंतर तुम्ही तुमच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थीची स्थिती पाहू शकता.

इतर अनेक योजनांचे उद्घाटन केले
पीएम किसान हप्त्याचे वितरण करण्यासोबतच पीएम मोदींनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आणखी काही योजनांची घोषणा केली. सुमारे 3,800 कोटी रुपयांच्या 'नमो शेतकरी महासम्मान निधी'चा दुसरा आणि तिसरा हप्ताही त्यांनी वितरित केला. महाराष्ट्रातील सुमारे 88 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. या योजनेंतर्गत, महाराष्ट्रातील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना वर्षाला 6000 रुपये अतिरिक्त रक्कम मिळते.

यासोबतच, पंतप्रधान महाराष्ट्रातील 5.5 लाख महिला बचत गटांना 825 कोटी रुपयांचा 'फिरता निधी' वितरित करतील. ही रक्कम राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान अंतर्गत भारत सरकारने प्रदान केलेल्या निधीव्यतिरिक्त आहे. ग्रामीण स्तरावर महिलांच्या सूक्ष्म-उद्योगांना प्रोत्साहन देऊन गरीब कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न वाढवण्यासाठी हा निधी दिला जातो. याशिवाय, संपूर्ण महाराष्ट्रात एक कोटी आयुष्मान कार्ड आणि इतर मागासवर्गीय (OBC) प्रवर्गातील लाभार्थींसाठी पंतप्रधानांनी 'मोदी आवास घरकुल योजना' सुरू केली. या योजनेत 2023-24 आर्थिक वर्ष ते 2025-26 या आर्थिक वर्षात एकूण 10 लाख घरे बांधण्याची योजना आहे. पंतप्रधान मोदींनी योजनेच्या 2.5 लाख लाभार्थ्यांना 375 कोटी रुपयांचा पहिला हप्ता हस्तांतरित केला.

 

Web Title: PM Kisan Yojana: Allocation of 16th installment of 'PM Kisan Samman' fund; Check like this

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.