Lokmat Money > बिझनेस न्यूज > पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता फक्त या शेतकऱ्यांनाच मिळणार; आजच हे काम करा

पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता फक्त या शेतकऱ्यांनाच मिळणार; आजच हे काम करा

PM Kisan Yojana: पीएम किसान सन्मान निधीच्या पुढील हप्त्याचा लाभ घेण्यासाठी दोन अटी पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहे. अन्यथा तुमच्या खात्यात २ हजार रुपये जमा होणार नाहीत.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2024 12:27 PM2024-09-10T12:27:38+5:302024-09-10T12:38:38+5:30

PM Kisan Yojana: पीएम किसान सन्मान निधीच्या पुढील हप्त्याचा लाभ घेण्यासाठी दोन अटी पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहे. अन्यथा तुमच्या खात्यात २ हजार रुपये जमा होणार नाहीत.

pm kisan yojana farmers e kyc 18th installment of pradhan mantri kisan samman nidhi yojana update | पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता फक्त या शेतकऱ्यांनाच मिळणार; आजच हे काम करा

पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता फक्त या शेतकऱ्यांनाच मिळणार; आजच हे काम करा

PM Kisan Yojana: सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांसाठी गूड न्यूज आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या १८व्या हप्त्याबद्दल नवी अपडेट समोर आली आहे. या योजनेच्या माध्यमातून १७ हप्ते मिळाले असून आता पुढील हप्त्याची शेतकरी वाट पाहत आहेत. मात्र, पीएम किमानच्या यादीत नाव असूनही अनेक शेतकरी या लाभापासून वंचित राहत आहेत. कारण, या योजनेच्या आवश्यक अटीशर्ती ते पूर्ण करत नाहीत. तुम्ही देखील या योजनेचे लाभार्थी असाल तर या अटीशर्ती आजच पूर्ण करुन घ्या.

तरच पीएम किसान योजनेचे पैसे खात्यावर जमा होतील
पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी केंद्र सरकारने काही काळापासून ई-केवायसीची प्रक्रिया अनिवार्य केली आहे. या सोबतच आपल्या जमिनीचे व्हेरीफिकेशन करणे देखील अनिवार्य करण्यात आले आहे. लाभार्थ्यांनी या अटी पूर्ण केल्या नाहीत तर पुढील हप्ता त्यांना मिळणार नाही. तुमचंही ई-केवायसी आणि लँड व्हेरीफिकेशन राहिलं असेल तर आजच पूर्म करा.

ऑनलाईन ई-केवायसी कसे करावे?
पीएम किमान योजनेच्या लाथार्भ्यांना ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने ई-केवायसी करण्याची सुविधा मिळते. यामध्ये आपण ऑनलाईन पद्धत सोप्या शब्दात समजून घेऊ.

  • सर्वात पहिल्यांदा पीएम किमान योजनेची अधिकृत वेबसाईट pmkisan.gov.in ला भेट द्या.
  • होम पेजवर Farmer Corner सेक्शनमध्ये ई-केवायसी पर्याय निवडा
  • पुढे ई-केवायसी पेजवर जाऊन आपला 12 अंकी आधार नंबर नोंदवा.
  • यानंतर सर्च ऑप्शनवर क्लिक करा.
  • आता आपला रजिस्टर्ड मोबाइल नंबर नोंदवावा लागेल.
  • नंबर टाकताच मोबाईलवर ओटीपी येईल. तो इथे टाका.
  • ओटीपी टाकल्यानंतर सबमिट बटनवर क्लिक करा.
  • असे केल्यास तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल.
  • ही माहिती देणारा मॅसेज तुमच्या मोबाईलवर येईल.

 

ऑफलाईन ई-केवायसी कशी करावी?
ज्या शेतकऱ्यांना ऑनलाईन ई-केवायसी प्रक्रीया अवघड वाटते. त्यांना ऑफलाईन प्रोसस करण्याचाही पर्याय सरकारने दिला आहे. यासाठी तुम्हाला जवळच्या कॉमन सर्विस सेंटरवर जावून ई-केवायसी पूर्ण करावी लागेल. यासाठी तुम्हाला काही शुल्क द्यावे लागेल. ई-केवायसी प्रक्रीया पूर्ण करताना तुमचं बँक खाते आधारला लिंक असणे आवश्यक आहे. नाहीतर ही प्रक्रीया पूर्ण होणार नाही.

पीएम किसानचा १८वा हप्ता कधी मिळणार?
मोदी सरकारने २०१९ मध्ये पीएम किसाम सन्मान निधी या महत्वाकांक्षी योजनेची सुरुवात केली आहे. या योजनेच्या माध्यमातून अल्पभूधारक शेतकऱ्यांना वार्षिक ६००० रुपये मिळतात. पीएम किमान निधीचे आतापर्यंत १७ हप्ते मिळाले आहे. आता १८व्या हप्त्याची शेतकरी वाट पाहत आहे. मीडिया रिपोर्टनुसार पुढील हप्ता ऑक्टोबर २०२४ मध्ये मिळण्याची शक्यता आहे. अद्याप याची अधिकृत सूचना देण्यात आलेली नाही.

Web Title: pm kisan yojana farmers e kyc 18th installment of pradhan mantri kisan samman nidhi yojana update

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.