PM किसान सन्मान निधीसंदर्भात महत्वाचे अपडेट आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वतीने गेल्या 31 मे रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात 11व्या हप्त्याचे 2000 रुपये ट्रान्सफर करण्यात आले होते. याच बरोबर केवायसी करण्याची अंतिम तारीखही पुन्हा एकदा वाढविण्यात आली होती. मात्र, आता 12 व्या हप्त्याचे पैसे खात्यात केव्हा जमा होणार, यासंदर्भात माहिती समोर येत आहे. या योजनेंतर्गत सरकार शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपये देते.
तीन टप्प्यांत दिले जातात दोन-दोन हजार रुपये -
ही रक्कम शासनाकडून प्रत्येकी दोन-दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये दिली जाते. याचा पहिला हप्ता दरवर्षी 1 एप्रिल ते जुलै दरम्यान, दुसरा हप्ता 1 ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्यान तर तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च या कालावधीत ट्रान्सफर केला जातो. गेल्या 31 मे रोजी लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर पहिला हप्ता (एकूण 11 वा हप्ता) आला आहे. यापूर्वी 1 जानेवारी 2022 रोजी गेल्या वर्षाचा शेवटचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला होता.
1 सप्टेंबरला पैसे येणे अपेक्षित -
आता लाभार्थी शेतकऱ्यांना 12व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. या हप्त्याचे पैसे ऑगस्ट ते सप्टेंबरदरम्यान ट्रान्सफर होण्याची शक्यता आहे. कृषी मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा 12 वा हप्ता 1 सप्टेंबरला देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे, सरकारच्या वतीने ई-केवायसी करण्याची अंतिम तारीख वाढवून 31 जुलै करण्यात आली आहे.