नवी दिल्ली : पीएम किसान सन्मान निधी योजनेचा (PM Kisan Yojana) 12 वा हप्ता केंद्र सरकारने सोमवारी (17 ऑक्टोबर) 8 कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर केला आहे. गेल्या वेळी 10 कोटींहून अधिक शेतकर्यांना पैसे मिळाले होते, तर यावेळी केवळ 8 कोटी शेतकर्यांच्या बँक खात्यात पैसे आले आहेत. जवळपास 2.62 कोटी शेतकरी 12 व्या हप्त्यापासून वंचित आहेत. उत्तर प्रदेशातील सुमारे 33 लाख शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचा12 वा हप्ता मिळालेला नाही.
उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने 12 व्या हप्त्याचे पैसे न मिळालेल्या उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. उत्तर प्रदेश सरकारने पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 12व्या हप्त्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी टोल फ्री नंबर (PM kisan Yojana Toll Free No.) जारी केला आहे. या नंबरवर कॉल करून शेतकरी पीएम किसान योजनेशी संबंधित सर्व समस्यांचे निराकरण करू शकतात. याशिवाय, उत्तर प्रदेश सरकारने प्रत्येक विकास ब्लॉकमध्ये सरकारी कृषी बीज भंडार येथे एक हेल्पडेस्क देखील स्थापित केला आहे.
याठिकाणी करू शकता कॉल18001801488 या टोल फ्री नंबरवर कॉल करून उत्तर प्रदेशातील शेतकरी अनेक प्रकारच्या समस्यांवर उपाय मिळवू शकतात. तसेच, सरकारने शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य ई-केवायसी करण्याचे आवाहन केले आहे. आतापर्यंत ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेले नाही, त्यांचे पैसे अडकले आहेत. राज्यातील प्रत्येक ब्लॉकच्या राजकीय कृषी भंडार येथे उभारण्यात आलेल्या हेल्प डेस्कवरही शेतकरी त्यांच्या भूखंडांची पडताळणी करू शकतात. पीएम किसान योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना येणाऱ्या इतर समस्याही येथे सोडवल्या जातील.
येथेही करू शकता संपर्कजर पीएम किसान सन्मान निधीचा 12 व्या हप्त्या तुमच्या खात्यावर पोहोचला नाही, तर तुम्ही हेल्पलाइन क्रमांक- 155261 किंवा 1800115526 किंवा 011-23381092 या नंबरवर संपर्क साधू शकता. याशिवाय, तुम्ही तुमची तक्रार pmkisan-ict@gov.in या ई-मेल आयडीवर मेल करू शकता. दरम्यान, पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत केंद्र सरकार शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये देते. ही रक्कम वर्षभरात दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये दिली जाते.