Lokmat Money > बिझनेस न्यूज > PM Kisan योजनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून ट्विट; दिली 'ही' महत्त्वाची माहिती

PM Kisan योजनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून ट्विट; दिली 'ही' महत्त्वाची माहिती

PM Kisan Yojana : या सरकारी योजनेंतर्गत केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या खात्यावर 2000 रुपयांचा हप्ता ट्रान्सफर करते.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2022 03:00 PM2022-04-11T15:00:08+5:302022-04-11T15:01:16+5:30

PM Kisan Yojana : या सरकारी योजनेंतर्गत केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या खात्यावर 2000 रुपयांचा हप्ता ट्रान्सफर करते.

pm kisan yojana pm kisan ekyc central government scheme pm modi tweet pm kisan 11th installment | PM Kisan योजनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून ट्विट; दिली 'ही' महत्त्वाची माहिती

PM Kisan योजनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून ट्विट; दिली 'ही' महत्त्वाची माहिती

नवी दिल्ली : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा (PM Kisan Yojana 2022) लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून महत्त्वाची माहिती दिली आहे. या सरकारी योजनेंतर्गत केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या खात्यावर 2000 रुपयांचा हप्ता ट्रान्सफर करते. लवकरच 11 व्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत. या सरकारी योजनेत तुम्ही अद्याप नोंदणी केली नसेल तर त्वरित पूर्ण करा. 

नरेंद्र मोदींचे ट्विट
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या अधिकृत ट्विटरवर म्हटले आहे की, 'देशाला आपल्या शेतकरी बंधू-भगिनींचा अभिमान आहे. शेतकरी जितके सशक्त होतील, तितका नवीन भारत समृद्ध होईल. पीएम किसान सन्मान निधी आणि शेतीशी संबंधित इतर योजना देशातील करोडो शेतकऱ्यांना नवीन बळ देत आहेत, याचा मला आनंद आहे.'

11.3 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर झाला निधी
पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 11.3 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 1.82 लाख कोटी रुपये थेट ट्रान्सफर करण्यात आला आहेत. कोरोना महामारीच्या काळात शेतकऱ्यांच्या खात्यावर 1.30 लाख कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत.

योजनेसाठी रजिस्ट्रेशनची प्रक्रिया...
- तुम्हाला अर्ज करण्यासाठी, सर्वात आधी योजनेच्या अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर जावे लागेल.
- येथे तुम्हाला होम पेजवर Farmer Corners ओपन करावा लागेल.
- आता तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशनचा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर एक फॉर्म ओपन होईल. 
- या फॉर्ममध्ये सर्व माहिती भरावी लागेल आणि त्यानंतर सबमिट करावी लागेल.
- आता सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज प्रक्रिया पूर्ण करा.

1 जानेवारी रोजी 10 वा हप्ता ट्रान्सफर 
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 10 व्या हप्त्याचे पैसे 1 जानेवारी 2022 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर करण्यात आले. देशातील करोडो शेतकऱ्यांच्या खात्यावर 2000 रुपयांचा हप्ता ट्रान्सफर करण्यात आले.
 
काय आहे पीएम किसान योजना?
पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत (PM Kisan Samman Nidhi Yojana) पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर ट्रान्सफर केली जाते. हे हप्ते दर चार महिन्यांनी खात्यात ट्रान्सफर केले जातात.

Web Title: pm kisan yojana pm kisan ekyc central government scheme pm modi tweet pm kisan 11th installment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.