Lokmat Money > बिझनेस न्यूज > PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी खुशखबर! आता स्वस्त दरात मिळणार कर्ज, जाणून घ्या कसे?

PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी खुशखबर! आता स्वस्त दरात मिळणार कर्ज, जाणून घ्या कसे?

PM Kisan Yojana : पीएम किसान सन्मान योजना आणि किसान क्रेडिट कार्ड योजना आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत लिंक करण्यात आल्या आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2022 03:22 PM2022-01-29T15:22:49+5:302022-01-29T15:28:05+5:30

PM Kisan Yojana : पीएम किसान सन्मान योजना आणि किसान क्रेडिट कार्ड योजना आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत लिंक करण्यात आल्या आहेत.

pm kisan yojana update kisan credit card online apply online registraion see here all process | PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी खुशखबर! आता स्वस्त दरात मिळणार कर्ज, जाणून घ्या कसे?

PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी खुशखबर! आता स्वस्त दरात मिळणार कर्ज, जाणून घ्या कसे?

नवी दिल्ली : केंद्र सरकारने पीएम किसान सन्मान योजनेचा (PM Kisan Yojana) 10 वा हप्ता जारी केला आहे. सरकारच्या या योजनेचा देशातील करोडो शेतकऱ्यांना लाभ मिळत आहे. या योजनेअंतर्गत सरकार शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात कर्जही उपलब्ध करून देते. दरम्यान, पीएम किसान सन्मान योजना आणि किसान क्रेडिट कार्ड योजना आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत लिंक करण्यात आल्या आहेत. या किसान क्रेडिट कार्ड योजनेवर सरकार शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात कर्ज उपलब्ध करून देत आहे.

कमी व्याजदरात कर्ज
शेतकऱ्यांना पेरणीसाठी बँकांकडून अत्यंत कमी व्याजदरात कर्ज मिळते. हे कर्ज किसान क्रेडिट कार्डद्वारेच दिले जाते. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज हमीशिवाय दिले जाते. तसेच, 5-3 लाख रुपयांचे अल्प मुदतीचे कर्ज केवळ 4 टक्के व्याजदराने दिले जाते. या कर्जावर सरकार 2 टक्के सबसिडी देते. याचबरोबर, कर्जाची वेळेवर परतफेड केल्यास 3 टक्के सूट दिली जाते. अशा प्रकारे, हे कर्ज केवळ 4 टक्के दराने मिळते, परंतु कर्जाची परतफेड करण्यास विलंब झाल्यास, या कर्जाचा व्याज दर 7 टक्के आकारला जातो.

किसान क्रेडिट कार्ड कसे बनवायचे?
1. किसान क्रेडिट कार्ड बनवण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला तहसीलमध्ये जाऊन लेखपाल यांना भेटावे लागेल.
2. लेखपाल यांच्याकडून तुमच्या जमिनीचे कागदपत्रे काढून घ्यावी लागतील.
3. यानंतर, कोणत्याही बँकेत जाऊन  बँक व्यवस्थापकाला भेटावे लागेल. त्यांच्याकडे किसान क्रेडिट कार्ड बनवण्याची मागणी करावी लागेल.
4. हे लक्षात ठेवा की जर किसान क्रेडिट कार्ड ग्रामीण बँकेतून बनवले असेल, तर सरकारकडून प्रोत्साहन वगैरे दिले जाते, ज्याचा फायदा शेतकऱ्यांना होतो.
5. यानंतर बँक व्यवस्थापक तुम्हाला वकिलाकडे पाठवेल आणि आवश्यक माहिती घेईल.
6. यानंतर तुम्हाला बँकेत जाऊन एक फॉर्म भरावा लागेल.
7. यासह काही कागदपत्रे असतील. त्यानंतर तुमचे किसान क्रेडिट कार्ड तयार होईल.
8. यामध्ये किती कर्जाची सुविधा मिळेल, हे तुमच्याकडे किती जमीन आहे, यावर अवलंबून आहे.

Web Title: pm kisan yojana update kisan credit card online apply online registraion see here all process

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.