Lokmat Money > बिझनेस न्यूज > मोदी सरकारच्या 'इंडिया फर्स्ट' योजनेमुळेच दहशतवाद कमी झाला; अर्थमंत्र्यांचा दावा

मोदी सरकारच्या 'इंडिया फर्स्ट' योजनेमुळेच दहशतवाद कमी झाला; अर्थमंत्र्यांचा दावा

९ वर्षे - ९ भव्य दिव्य विकासकामे ... निर्मला सीतारामन यांनी वाचला विकासाचा पाढा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2023 07:50 PM2023-05-29T19:50:41+5:302023-05-29T19:51:01+5:30

९ वर्षे - ९ भव्य दिव्य विकासकामे ... निर्मला सीतारामन यांनी वाचला विकासाचा पाढा

Pm Modi govt India First policy reduced terrorism in past nine years no major terrorist attack | मोदी सरकारच्या 'इंडिया फर्स्ट' योजनेमुळेच दहशतवाद कमी झाला; अर्थमंत्र्यांचा दावा

मोदी सरकारच्या 'इंडिया फर्स्ट' योजनेमुळेच दहशतवाद कमी झाला; अर्थमंत्र्यांचा दावा

Nirmala Sitharaman on Terrorism, Modi Govt: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारच्या नऊ वर्षांच्या कार्यकाळात नवीकरणीय ऊर्जा क्षेत्र भारतासाठी सर्वात मोठे आधार असल्याचे अधोरेखित केले. त्या नऊ वर्षांत अक्षय्य ऊर्जा क्षेत्रात भारताने जेवढे यश मिळवले आहे, तेवढे जगातील कोणत्याही देशाने मिळवले नाही, असे त्यांनी आवर्जून सांगितले. दहशतवादाच्या मुद्द्यावर, त्या म्हणाल्या की, गेल्या नऊ वर्षांत काही सीमेवरील चकमकी वगळता देशावर कोणताही मोठा दहशतवादी हल्ला झालेला नाही. मोदी सरकारच्या ‘इंडिया फर्स्ट’ धोरणामुळेच हे शक्य झाले. भारताच्या इतिहासात ही पहिलीच वेळ आहे जेव्हा गरिबांना सुरक्षितता आणि सन्मान मिळाला, असेही त्या म्हणाल्या. तसेच, कराच्या महसुलाचा प्रत्येक पैसा भारतातील गरिबांच्या सेवेसाठी वापरला जात असून लसीकरण कार्यक्रम हे त्याचे उत्तम उदाहरण असल्याचे त्यांनी सांगितले.

देशातील गरिबांसाठी तब्बल 3.5 कोटी पक्की घरे बांधण्यात आली. देशभरात मोठ्या प्रमाणावर शौचालये बांधली गेली. सरकारी दाव्यांनुसार, ग्रामीण भारतात 100% शौचालय बांधणी झाली. पिण्याच्या पाण्याचे प्रश्न असोत किंवा उज्ज्वला योजना असो, या विविध योजनांचा लाभ आतापर्यंत 9.5 कोटी कुटुंबांनी घेतला आहे. 80 कोटी लोकांना पूर्ण दोन वर्षे मोफत अन्नधान्य आणि काही कडधान्ये देण्यात आली. मोदी सरकारच्या नऊ वर्षांना आणखी उल्लेखनीय बनवणारी गोष्ट म्हणजे, कोविड काळातील भारताची भूमिका आणि युक्रेन युद्धातील रोखठोक भूमिका असे त्या म्हणाल्या. तसेच, राम मंदिरांचे बांधकामही पूर्ण करण्यात आले असून वर्षाच्या अखेरीस किंवा 2024च्या सुरुवातीला हे मंदिर खुले होणार असल्याचे त्या म्हणाल्या.

सीतारामन यांनी सांगितल्या मोदी सरकारच्या ९ मोठ्या गोष्टी

१. 9 वर्षात 74 विमानतळ
२. विक्रमी बांधकाम गती - जवळपास 54,000 किमी नवीन राष्ट्रीय महामार्ग
३. 2014 पूर्वीच्या 0 जलमार्गापासून 9 वर्षांत 111 जलमार्ग
४. वंदे भारत एक्सप्रेस - 9 वर्षांत 20 जागतिक दर्जाच्या ट्रेन्स
५. गेल्या 9 वर्षांत 15 नवीन AIIMS, 7 नवीन IIT, 7 नवीन IIM, 390 नवीन विद्यापीठे
६. 9,300 हून अधिक जनऔषधी केंद्रांवर परवडणारी औषधे
७. उच्च शिक्षणामध्ये 10% EWS कोटा लागू केला, त्यामुळे आता आर्थिक निकषांवर आरक्षण
८. मागासवर्गीय आयोगासाठी घटनात्मक दर्जा हा सामाजिक सक्षमीकरणातील मैलाचा दगड
९. दिव्यांग श्रेणीत वाढ करून ते 7 वरून 21 पर्यंत वाढवले

Web Title: Pm Modi govt India First policy reduced terrorism in past nine years no major terrorist attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.