Lokmat Money > बिझनेस न्यूज > PM Modi Net Worth: कोणत्या बँकेत आहे PM नरेंद्र मोदींचं खातं, कुठे आहे गुंतवणूक? पाहा डिटेल्स

PM Modi Net Worth: कोणत्या बँकेत आहे PM नरेंद्र मोदींचं खातं, कुठे आहे गुंतवणूक? पाहा डिटेल्स

PM Modi Net Worth: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. या काळात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपल्या मालमत्तेचा संपूर्ण हिशेब दिला आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2024 04:04 PM2024-05-15T16:04:28+5:302024-05-15T16:05:39+5:30

PM Modi Net Worth: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. या काळात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपल्या मालमत्तेचा संपूर्ण हिशेब दिला आहे. 

PM Modi Net Worth: In which bank is PM Narendra Modi s account where are the investments See details | PM Modi Net Worth: कोणत्या बँकेत आहे PM नरेंद्र मोदींचं खातं, कुठे आहे गुंतवणूक? पाहा डिटेल्स

PM Modi Net Worth: कोणत्या बँकेत आहे PM नरेंद्र मोदींचं खातं, कुठे आहे गुंतवणूक? पाहा डिटेल्स

PM Modi Net Worth: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) उत्तर प्रदेशातील वाराणसी मतदारसंघातून तिसऱ्यांदा लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election 2024) लढवत आहेत. त्यासाठी त्यांनी मंगळवारी त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. या काळात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपल्या मालमत्तेचा संपूर्ण हिशेब दिला आहे. 
 

पंतप्रधान मोदींच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात देशाची अर्थव्यवस्था जगात दहाव्या स्थानावरून पाचव्या क्रमांकावर गेली आहे. या काळात शेअर बाजारातही जोरदार तेजी पाहायला मिळाली आहे. पण मोदींच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार त्यांचा गुंतवणुकीच्या पारंपरिक पद्धतींवर विश्वास आहे. त्यांनी एफडी आणि पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये गुंतवणूक केली आहे. त्यांची जंगम मालमत्ता ३.०२ कोटी रुपये असून त्यांच्याकडे केवळ ५२,९२० रुपयांची रोकड आहे. पंतप्रधानांकडे स्वत:चं घर नाही. तसंच त्यांच्याकडे कोणतीही गाडीही नाही.
 

कुठे किती गुंतवणूक?
 

निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, २०१८-१९ मध्ये पंतप्रधानांचे करपात्र उत्पन्न ११ लाख रुपये होते, ते २०२२-२३ मध्ये वाढून २३.५ लाख रुपये झालं. मोदींनी बँकेतील ठेवी आणि राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (एनएससी) मध्ये गुंतवणूक केली आहे. एसबीआयमध्ये त्यांची २.८५ कोटी रुपयांची एफडी आहे. एनएससीमध्ये त्यांची ९.१२ लाख रुपयांची गुंतवणूक आहे. 
 

एनएससी ही पोस्ट ऑफिसची योजना आहे. आयटी कायद्याच्या कलम ८० सी अंतर्गत वार्षिक ७.७ टक्के व्याजासह कर लाभ दिला जातो. याचा लॉक-इन कालावधी पाच वर्षांचा असून सुरुवातीची गुंतवणूक एक हजार रुपये आहे. एफडी आणि एनएससीमध्ये मोदींची गुंतवणूक सुमारे तीन कोटी रुपये आहे. प्रतिज्ञापत्रानुसार, पंतप्रधान मोदींकडे सोन्याच्या चार अंगठ्या आहेत, ज्याची किंमत २,६७,७५० रुपये आहे.
 

कमाई स्त्रोत कोणते?

प्रतिज्ञापत्रानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत सरकारकडून मिळणारं वेतन आणि बचतीवरील व्याज आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षात त्यांनी ३ लाख ३३ हजार १७९ रुपयांचा आयकर भरला. गुजरातमधील स्टेट बँकेच्या गांधीनगर शाखेतील खात्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७३,३०४ रुपये जमा केले आहेत. वाराणसीच्या बँक खात्यात एकूण सात हजार रुपये जमा आहेत. या प्रतिज्ञापत्रात पंतप्रधान मोदींनी आपल्या गेल्या पाच वर्षांच्या उत्पन्नाचा हिशेबही दिला आहे. २०१८-१९ मध्ये त्यांचं उत्पन्न ११,१४,२३० रुपये, २०१९-२० मध्ये १७,२०,७६० रुपये, २०२०-२१ मध्ये १७,०७,९३० रुपये, २०२१-२२ मध्ये १५,४१,८७० रुपये आणि २०२२-२३ मध्ये २३,५६,०८० रुपये होते. पंतप्रधान मोदींनी शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडात कोणतीही गुंतवणूक केलेली नाही.
 

Web Title: PM Modi Net Worth: In which bank is PM Narendra Modi s account where are the investments See details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.