२०२३ मध्ये भारतातून निर्यात होणाऱ्या गोष्टींमध्ये मोबाइल फोन सर्वात मोठ्या १० निर्यात श्रेणीत यावा अशी इच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केली आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर म्हणाले की यासाठी इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग इकोसिस्टमला आणखी उत्तम करण्यासाठी सर्व उपाययोजना करण्यात येतील. सरकार देशात इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग इकोसिस्टमला प्रोत्साहन देण्यासाठी सर्व आवश्यक उपाय योजना करेल आणि २०२३ मध्ये मोबाइळ फोन निर्मितीच्या बाबतीत मॅन्युफॅक्चरिंग बेस वाढवण्यावर विचार करेल, असंही ते म्हणाले. २०२३ या वर्षात १ लाख कोटींच्या मोबाइल फोन निर्यातीचं पंतप्रधान नरेंद्र मोदींचं व्हिजन आहे. यात सर्वात मोठ्या १० निर्यात श्रेणीत मोबाइल फोनचा समावेश आहे.
कोणत्या कंपन्यांचा दबदबा
भारत मोबाइल फोन निर्यातीच्या क्षेत्रात सातत्यानं प्रगती करत आहे. सध्या भारताचा मोबाइल निर्यात व्यवसाय ४५ हजार कोटींचा आहे आणि यात अॅप्पल आणि सॅमसंग या दोन कंपन्यांचा दबदबा राहिला आहे. हियरेबल्स आणि वायरलेस सेगमेंट, आयटी हार्डवेअर, इलेक्ट्रॉनिक्स कंपोनेंट्स इत्यादी क्षेत्रात भारताची हिस्सेदारी वाढेल यासाठी इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग इकोसिस्टमला व्यापक पातळीवर काम करण्यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचंही चंद्रशेखर म्हणाले.
इलेक्ट्रॉनिक्स कंपोनेंट निर्मात्या संस्था ELCINA च्या अभ्यासानुसार, २०२०-२१ मध्ये कंपोनेंट्सची मागणी सुमारे ७० अब्ज डॉलर (५.८ लाख कोटी रुपये) किमतीच्या उद्योगासाठी USD ३२ अब्ज (सुमारे २.६५ लाख कोटी) इतकी होती आणि यापैकी जेमतेम १० अब्ज अमेरिकन डॉलर (८२,००० कोटी रुपये) किमतीचे इलेक्ट्रॉनिक्स स्थानिक पातळीवर आयात केलेल्या कच्च्या मालासह तयार केले गेले. अधिकृत सूत्रांनी सांगितले की, सरकार स्थानिक उत्पादनाला चालना देण्यासाठी यासंबंधी एक प्रोत्साहन योजना आणण्याचा विचार करत आहे.
PM @narendramodi ji's visionary PLI scheme is growng investments, exports and jobs. #NewIndia as export hub - >1 Lac cr of mobilephone exports in 2023.
— Rajeev Chandrasekhar 🇮🇳 (@Rajeev_GoI) January 2, 2023
50,000 Direct jobs by Apple ecosystem alone in 17 months post PLI. Plus more indirect jobs. Congrats 👍🏻🙏🏻#IndiaTechadepic.twitter.com/9SfZh5sErg
मोबाईल फोनच्या क्षेत्रात भारताची प्रगती
मोबाईल फोन्सची इकोसिस्टम व्यापक करण्यावर सरकार भर देणार आहे. सेमीकंडक्टर स्पेसमध्ये मोठी मागणी आहे. आपल्याकडचे उद्योग वाढवायचे आहेत हे आता स्पष्ट आहे. मोबाईल फोनच्या क्षेत्रात देश पुढे जात आहे. आम्हाला IT सर्व्हर, IT हार्डवेअर, Hearables आणि Wearables विभागात चांगली कामगिरी करायची आहे, असंही चंद्रशेखर म्हणाले.
कोणत्या ब्रँडनं बनवली जागतिक ओळख
भारतीय ब्रँड 'बोट'नं (BOAT) Hearables आणि Wearables विभागात सर्वाधिक विक्री केली आहे. मार्केट रिसर्च फर्म रिसर्च अँड मार्केट्सनुसार, साल २०२२ मध्ये भारतीय सर्व्हर बाजाराचं मूल्य १.६ बिलियन अमेरिकन डॉलर इतका होता आणि यात ७.१९ टक्क्यांनी वार्षिक वाढ अपेक्षित आहे.