Join us  

फ्रान्समध्ये भारताचा डंका, आता UPI द्वारे पेमेंट करता येणार; 'या' ठिकाणापासून सुरुवात होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2023 9:36 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फ्रान्स दौऱ्यादरम्यान भारताला मोठं यश मिळालंय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या फ्रान्स दौऱ्यावर आहेत. पंतप्रधानांच्या फ्रान्स दौऱ्यादरम्यान भारतासाठी मोठं यश मिळालंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रों यांच्या भेटीनंतर फ्रान्स आणि भारत यांच्यात युपीआय (UPI) बाबतचा करार निश्चित झाला आहे. युनिफाइड पेमेंट इंटरफेसच्या (UPI) वापराबाबत भारत आणि फ्रान्स यांच्यात एक करार झाला आहे. म्हणजेच, आता तुम्हाला फ्रान्समध्येही युपीआय वापरता येणार आहे.

फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी भारतीयांना संबोधित केलं. लवकरच भारतीय पर्यटक आयफेल टॉवरवरही युपीआयद्वारे पेमेंट करू शकतील, असं ते म्हणाले. "फ्रान्समध्ये युपीआयद्वारे पेमेंट करण्याचा करार करण्यात आला आहे. त्याची सुरुवात आयफेल टॉवरपासून होईल. भारतीय येथे यूपीआयच्या माध्यमातून रुपयात पैसे भरू शकतील. या करारामुळे भारतीय नवनिर्मितीसाठी मोठी नवी बाजारपेठ खुली होईल," असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

युपीआयद्वारे सामाजिक परिवर्तनभारताचे UPI असो किंवा इतर डिजिटल प्लॅटफॉर्म, त्यांनी देशात मोठा सामाजिक बदल घडवून आणला आहे. मला आनंद आहे की भारत आणि फ्रान्स या दिशेने एकत्र काम करत आहेत, असं पॅरिसमध्ये ला सीन म्युझीकलमध्ये भारतीय समुदायाला संबोधित करताना मोदी म्हणाले. एएनआयनं यासंदर्भातील वृत्त दिलंय. उल्लेखनीय बाब म्हणजे गेल्या वर्षी २०२२ मध्ये, युपीआय सेवा प्रदान करणारी आघाडीची संस्था, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं (NPCI) फ्रान्सच्या ऑनलाइन पेमेंट सिस्टम 'Lyra' सोबत एक सामंजस्य करार केला होता.

टॅग्स :फ्रान्सभारतनरेंद्र मोदी