नवी दिल्ली - देशातील या एका दिग्गज गुंतवणूकदार कपलने पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. या भेटीनंतर सोशल मीडियावर जबरदस्त चर्चा सुरू आहे. चुरगळलेला आणि प्रेसही न केलेल्या ढील्या-ढाल्या शर्टवर पंतप्रधान मोदी यांना अत्यंत आत्मविश्वासाने भेटणारे राकेश झुनझुनवाला आणि त्यांचे कुटुंब जवळपास 22,300 कोटी रुपयांच्या संपत्तीचे मालक आहे.
राकेश झुनझुनवाला यांनी हे सिद्ध केले आहे, की कपड्यांवरून एखाद्या व्यक्तीची ओळख होत नसते. जगातील कोणत्याही शक्तिशाली व्यक्तीला भेटण्यासाठी कपडे नव्हे, तर आत्मविश्वास महत्वाचा असतो. पण, खरे तर आपल्याकडे हजारो कोटींची संपत्ती असेल, तर आत्मविश्वास आपोआपच येतो.
राकेश झुनझुनवाला आणि त्याची पत्नी रेखा झुनझुनवाला यांनी मंगळवारी सायंकाळी घेतलेल्या मोदींच्या भेटीनंतर, लोकांनी सोशल मीडियावर त्यांची मजा घेतली आहे. कुणी म्हणाले, 'भाऊ, यांना इस्तरी द्या', तर कुणी म्हटले, पीएम मोदी त्यांच्यासमोर एखाद्या फॅन प्रमाणे उभे असलेले दिसत आहेत. खरे तर, आपण जेव्हा linen चा शर्ट घालून प्रवास करता, तेव्हा त्यावर अशा प्रकारचे रिंकल्स येतातच.
कोन आहेत राकेश झुनझुनवाला?
राकेश झुनझुनवाला हे देशातील शेअर बाजारातील एक दिग्गज गुंतवणूकदार आहेत. त्यांना बिग बुलही म्हटले जाते. त्यांच्या प्रत्येक पावलावर कोट्यवधी गुंतवणूकदारांची नजर असते. राकेश ज्या शेअरला हात लावतात, त्याचे सोने होते. एवढेच नाही तर, त्यांचे अनुसरण करून शेअर्समध्ये गुंतवणूक करणारे अनेक लोक श्रीमंतही झाले आहेत. हारून इंडियाने नुकत्याच जाहीर केलेल्या श्रीमंतांच्या यादीनुसार, राकेश झुनझुनवाला आणि त्यांच्या कुटुंबाची एकूण संपत्ती तब्बल 22,300 कोटी रुपये एवढी आहे. देशातील अनेक कंपन्यांमध्येही त्यांचा वाटा आहे आणि ते लवकरच एक विमान सेवाही सुरू करणार आहेत.
स्वतः पीएम मोदी यांनी काल सायंकाळी ट्विट करत या भेटीसंदर्भात माहिती दिली. यानंतर, ट्विटर युझर्स जबरदस्त मजा घेताना दिसत आहेत. जादू नावाच्या एका युझरने लिहिले आहे, की भाऊ, यांना कुणी इस्तरी घेऊन द्या. तर, शिवाजी शुक्ल नावाच्या एका ट्विटर यूझरने लिहिले आहे, पीएम मोदी तर यांच्या समोर एका फॅनसारखे दिसत आहेत.
Looks like a fan boy moment for PM 😜
— Shivaji Shukla (@shivaji_20) October 5, 2021
Save it for inspiration 😊#RakeshJhunjhunwala#bigbullpic.twitter.com/p0MnJjhMPC