Join us

ठरलं! पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत इलॉन मस्क यांची भेट घेणार, भारतात Tesla Car कारखाना उभारण्यावर होणार चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2023 1:22 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत. तीन दिवसाच्या दौऱ्यात पीएम मोदी मोठ्या कंपन्यांच्या सीईओंसोबतही चर्चा करणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांसाठी अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांचा दौरा २१ जून ते २४ जून दौरा असणार आहे. पीएम मोदी या दरम्यान जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांची भेट घेणार आहेत. टेस्ला भारतात फॅक्टरी सुरू करण्याच्या प्रोजेक्टवर काम करत आहे, या दरम्यानच मोदींची ही भेट महत्वपूर्ण ठरणार आहे. या भेटील टेस्लाच्या प्रोजेक्टवर चर्चा होण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. 

हेल्थ इन्शूरन्सचा दावा नाकारला, तुमचीही अशी तक्रार आहे? जाणून घ्या क्लेम मिळवण्याची योग्य पद्धत

एका अहवालानुसार, पंतप्रदान नरेंद्र मोदी आपल्या तीन दिवसाच्या दौऱ्यात २४ जणांची भेट घेणार आहेत. या भेटीचा अजेंडा काय असेल याची माहिती अजुनही समोर आलेली नाही. इलॉन मस्क यांनी टेस्ला कार भारतात आणण्याचे संकेत दिले आहेत. मात्र अद्यापही याबाबत अनुकूल परिस्थिती निर्माण झालेली नाही.

गेल्या वर्षी, भारताने कारवरील आयात कर कमी करण्याच्या टेस्लाच्या विनंतीला मान्यता देण्यास नकार दिला होता. टेस्लाने स्थानिक पातळीवर वाहने तयार करावीत अशी भारताची इच्छा आहे, पण टेस्लाला आधी कार आयात करायची आहे आणि भारतीय बाजारपेठेत त्याची चाचणी घ्यायची आहे.

या वर्षाच्या सुरुवातीला, वॉल स्ट्रीट जर्नलला दिलेल्या मुलाखतीत, मस्क म्हणाले होते की, ऑटोमेकर कदाचित या वर्षाच्या अखेरीस नवीन कारखान्यासाठी साइट निवडू शकेल. नवीन कारखाना उभारण्यासाठी भारत हे चांगले ठिकाण आहे का असे विचारले असता. यावर मस्क म्हणाले होते- 'एकदम भारत योग्य जागा आहे.' 

जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक वाहन कंपनी असलेल्या टेस्लाच्या गाड्या जगभर विकल्या जातात. भारतातील लोकही त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. इलॉन मस्क यांची इच्छा आहे की भारत सरकारने टेस्ला कारवरील आयात शुल्क कमी करावे, जेणेकरून ते परदेशात बनवलेल्या टेस्ला कार भारतीय बाजारपेठेत सहज विकू शकतील. मात्र भारत सरकार याबाबत अजिबात तयार नाही.

बाहेरच्या देशांमध्ये बनवलेल्या टेस्ला कार भारतीय बाजारपेठेत विकण्यावर आयात सवलत अजिबात नाही, असे केंद्र सरकारचे स्पष्ट म्हणणे आहे. सरकारचा असा युक्तिवाद आहे की टेस्ला कंपनीने भारतात आपला प्लांट उभारावा, त्यानंतर कोणत्याही प्रकारची सूट विचारात घेतली जाईल. चीनमध्ये बनवलेली टेस्लाची कार भारतात विकण्याची परवानगी देता येणार नाही, असे भारत सरकारने स्पष्टपणे सांगितले होते. टेस्लाने अमेरिकेबाहेर चीनमध्ये आपला पहिला प्लांट उभारला आहे. येथूनच कंपनीला भारतात इलेक्ट्रिक कारची आयात करायची आहे. यावर सरकारची संमती नाही.

टॅग्स :नरेंद्र मोदीटेस्लाएलन रीव्ह मस्कअमेरिका