Narendra Modi : देशात दरवर्षी करोडो लोक आयकर रिटर्न्स दाखल करतात. अनेकजण कर वाचवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब करतात. कोणी अल्पबचत योजनेत गुंतवणूक करतो, तर कोणी FD मध्ये पैसे गुंतवतो. बरेच लोक म्युच्युअल फंडच्या माध्यमातून कर बचत करतात. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील कर वाचवण्यासाठी विविध योजनांमध्ये गुंतवणूक करतात.
तुम्ही विचार करत असाल की, पंतप्रधान मोदींना कर वाचवण्याची काय गरज आहे, पण हे खरं आहे. पीएम मोदींनीही कर वाचवण्यासाठी अनेक योजनांमध्ये गुंतवणूक केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 2019 मध्ये निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांनी याबाबत माहिती दिली आहे.
LIC मध्ये गुंतवणूक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार त्यांनी एलआयसीच्या योजनांमध्ये गुंतवणूक केली आहे. त्यांनी एलआयसीच्या दोन पॉलिसी घेतल्या आहेत. 2010 मध्ये पहिली पॉलिसी घेतली, ज्याचे सिंगल प्रीमियम 49,665 रुपये आहे. दुसरी एलआयसी पॉलिसी 2013 सालची आहे, ज्याचा सिंगल प्रीमियम 1,40,682 रुपये आहे. याचा अर्थ त्यांनी एकूण 1,90,347 रुपयांची गुंतवणूक केली आहे.
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रामध्ये गुंतवणूक
सरकारची लहान बचत योजना राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रामध्ये गुंतवणूक करणेदेखील खूप फायदेशीर आहे. यामध्ये तुम्ही दरवर्षी 1.5 लाख रुपयांपर्यंतचा कर वाचवू शकता. देशाच्या पंतप्रधानांनी पाच वर्षांच्या लॉक-इन कालावधीसह या योजनेत गुंतवणूक केली आहे. नरेंद्र मोदी 2014 मध्ये पंतप्रधान झाल्यापासून आणि 2019 पर्यंत त्यांनी NAC मध्ये 23 वेळा गुंतवणूक केली आहे. 2019 च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार एकूण मूल्य 7,61,466 रुपये आहे. या योजनेत गुंतवणूकदारांना 7 टक्के परतावा मिळतो. या योजनेत तुम्ही किमान रु. 1000 ची गुंतवणूक करू शकता आणि कमाल गुंतवणुकीवर कोणतीही मर्यादा नाही.