PM Surya Ghar Yojana : लोकसभा निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वी केंद्र सरकारने पीएम सूर्य घर मोफत वीज योजना (PM Surya Ghar Yojana) आणली. या योजनेंतर्गत देशभरातील एक कोटी घरांवर सोलर पॅनल बसवले जाणार असून, या सर्व कुटुंबांना दरमहा 300 युनिट मोफत वीज दिली जाणार आहे. यामुळेच या योजनेला पीएम सूर्य घर मोफत वीज योजना नाव देण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या योजनेअंतर्गत सरकार 78 हजार रुपयांची सूटदेखील देत आहे.
एक कोटीहून अधिक अर्ज
पीएम सूर्य घर योजनेंतर्गत सरकार सौर पॅनेल बसविण्यावर मोठ्या प्रमाणात सूट देत आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत एक कोटीहून अधिक लोकांनी अर्ज केले आहेत. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये ही माहिती दिली. विशेष म्हणजे, देशातील सर्व गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंब या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
शासन अनुदान देईल
पीएम सूर्य घर योजनेंतर्गत सरकार भरीव सबसिडी देत आहे. ही सबसिडी तुमच्या सौर पॅनेलनुसार उपलब्ध असेल. म्हणजेच, तुम्ही एक किलोवॅटचे सोलर पॅनल लावल्यास तुम्हाला कमी सबसिडी मिळेल, तर तीन किलोवॅट किंवा त्याहून अधिक क्षमतेचे सोलर पॅनल बसवल्यास तुम्हाला अधिक सबसिडी दिली जाईल.
सर्वात मोठी सूट कोणाला मिळेल?
एक किलोवॅटपर्यंत सौर पॅनेल बसवणाऱ्याला 18 हजार रुपयांची सबसिडी दिली जाईल, असे सरकारकडून सांगण्यात आले आहे. तसेच, दोन किलोवॅटपर्यंतच्या सोलर पॅनलवर 30 हजार रुपयांची सूट दिली जाईल, तर तीन किलोवॅट किंवा त्यापेक्षा जास्त क्षमतेचे सोलर पॅनल बसवणाऱ्या व्यक्तीला 78 हजार रुपयांचे अनुदान दिले जाईल. म्हणजेच या सूर्य घर योजनेत तुम्हाला 78 हजार रुपयांपर्यंत सबसिडी मिळू शकते.