Join us

PM Suryaghar Yojana : रुफ टॉप सोलार पॅनलमधून किती तयार होणार वीज, किती होईल फायदा?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 8:32 AM

PM Suryaghar Yojana : सरकारनं नुकतीच पीएम सूर्य घर मोफत वीज योजना सुरू केली आहे. छतावर सौर पॅनेल बसविण्याशी संबंधित ही योजना आहे. याबाबत मोहीम सुरू करण्यात आलीये.

PM Suryaghar Yojana : सरकारनं नुकतीच पीएम सूर्य घर मोफत वीज योजना सुरू केली आहे. छतावर सौर पॅनेल बसविण्याशी संबंधित ही योजना आहे. याबाबत मोहीम सुरू करण्यात आलीये. योजनेबद्दल जास्तीत जास्त जागरुकता वाढवणं हा त्याचा उद्देश आहे. जे छतावर सोलार इलेक्ट्रिसिटी पॅनल बसवण्याचा पर्याय निवडतील अशा १ कोटी या स्कीमद्वारे कुटुंबांना मोफत वीज मिळणार आहे.

काय आहे ही योजना? 

पीएम सूर्य घर मोफत वीज योजना ही केंद्र सरकारची योजना आहे. याद्वारे देशातील एक कोटी कुटुंबांना मोफत वीज पुरवण्याचे उद्दिष्ट आहे. तुम्ही छतावर सोलार इलेक्ट्रिसिटी युनिट बसवण्याचा पर्याय निवडल्यास ही मोफत वीज उपलब्ध होईल. याअंतर्गत घरमालकांना दरमहा ३०० युनिट मोफत वीज मिळू शकणार आहे. 

किती बचत होणार? 

पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेमुळे दरवर्षी सुमारे १५ हजार रुपयांची बचत होणार आहे. दरमहा ३०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या कुटुंबाला ३ किलोवॅट क्षमतेचं रूफ टॉप सोलर युनिट बसवावं लागेल. याद्वारे कुटुंबाची स्वतःची वीजनिर्मिती होऊ शकते. यामुळे त्याच्या मासिक बिलात १,८०० ते १,८७५ रुपयांची बचत होईल. त्यांच्या विजेचा खर्च कमी करण्यासोबतच घरमालक अतिरिक्त वीज विकून पैसे कमवू शकतील. 

अनुदानावर मर्यादा 

उपक्रमांतर्गत, २ आणि ३ किलोवॅट क्षमतेच्या सिस्टमसाठी ४० टक्के अतिरिक्त सिस्टम खर्चावर अनुदान दिलं जात आहे. तर २ किलोवॅट क्षमतेपर्यंतच्या प्रणालींसाठी, सोलर युनिटच्या खर्चाच्या ६० टक्के कव्हर केलं जातंय. अनुदानावर ३ किलोवॅट क्षमतेची मर्यादा आहे. सध्याच्या बेंचमार्क दरांनुसार, १ किलोवॅट सिस्टमवर ३० हजार रुपये, २ किलोवॅट सिस्टमवर ६० हजार रुपये आणि ३ किलोवॅट सिस्टमवर किंवा त्याहून अधिकवर ७८ हजार रुपयांचं अनुदान उपलब्ध असेल.

टॅग्स :पंतप्रधानवीज