Lokmat Money > बिझनेस न्यूज > पीएम विद्यालक्ष्मी योजना की शैक्षणिक कर्ज? तुमच्यासाठी योग्य कोणते? कुठे मिळेल सर्वाधिक लाभ

पीएम विद्यालक्ष्मी योजना की शैक्षणिक कर्ज? तुमच्यासाठी योग्य कोणते? कुठे मिळेल सर्वाधिक लाभ

PM Vidyalaxmi Scheme Vs Education Loan : पीएम विद्यालक्ष्मी योजना ही एक प्रकारे शैक्षणिक कर्जासारखीच आहे. पण, पारंपारिक शैक्षणिक कर्जापेक्षा अनेक प्रकारे वेगळी आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2024 04:39 PM2024-11-15T16:39:28+5:302024-11-15T16:41:04+5:30

PM Vidyalaxmi Scheme Vs Education Loan : पीएम विद्यालक्ष्मी योजना ही एक प्रकारे शैक्षणिक कर्जासारखीच आहे. पण, पारंपारिक शैक्षणिक कर्जापेक्षा अनेक प्रकारे वेगळी आहे.

pm vidyalaxmi scheme vs education loan how different is pm vidyalaxmi yojana from education loan | पीएम विद्यालक्ष्मी योजना की शैक्षणिक कर्ज? तुमच्यासाठी योग्य कोणते? कुठे मिळेल सर्वाधिक लाभ

पीएम विद्यालक्ष्मी योजना की शैक्षणिक कर्ज? तुमच्यासाठी योग्य कोणते? कुठे मिळेल सर्वाधिक लाभ

PM Vidyalaxmi Scheme Vs Education Loan : वाढत्या महागाईत फक्त मूलभूत गोष्टींचे दर वाढले नाहीत. तर शिक्षणही प्रचंड महाग झालं आहे. अशात शैक्षणिक कर्ज घेण्यावाचून पर्याय राहत नाही. मात्र, शैक्षणिक कर्जाची (Education Loan) किचकट प्रक्रियेमुळे अनेकजण शिक्षणाचा नाद सोडून देतात. पण, आता काळजी करण्याचे कारण नाही. कारण, केंद्र सरकारने उच्च शिक्षणासाठी पीएम विद्यालक्ष्मी योजना (PM Vidyalaxmi Scheme) आणली आहे. ज्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदतीची गरज आहे, अशा विद्यार्थ्यांना लक्षात घेऊन ही योजना लाँच केली आहे. ही योजना देखील शैक्षणिक कर्जासारखीच आहे. पण, तरीही ती अनेक प्रकारे पारंपारिक शैक्षणिक कर्जापेक्षा वेगळी आहे. यातील फरक जाणून घेतल्यानंतर तुम्हाला अधिक स्पष्ट होईल.

पीएम विद्यालक्ष्‍मी योजना काय आहे?
प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजना हा भारत सरकारचा एक उपक्रम आहे. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी सुलभ आर्थिक सहाय्य पुरवणे हा योजनेचा उद्देश आहे. पीएम विद्यालक्ष्मी योजना विद्यार्थ्यांना केवळ कर्जच देत नाही तर शिष्यवृत्ती देखील देते. शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांना या योजनेंतर्गत बँक कर्ज, शिष्यवृत्ती आणि कर्ज सवलती यांसारख्या इतर आर्थिक सेवा देखील मिळतात. ही योजना भारतीय विद्यार्थ्यांना परदेशात आणि देशांतर्गत उच्च शिक्षणासाठी आवश्यक आर्थिक सहाय्य करण्यासाठी मदत करते.

शैक्षणिक कर्ज म्हणजे काय?
शैक्षणिक कर्ज हे बँक किंवा इतर वित्तीय संस्थांद्वारे विद्यार्थ्यांना त्यांच्या उच्च शिक्षणासाठी दिले जाणारे कर्ज आहे. हे कर्ज ट्यूशन फी, पुस्तके, निवास, प्रवास आणि विविध शैक्षणिक संस्थांशी संबंधित इतर खर्चासाठी दिले जाते. या कर्जाची सहसा ठराविक कालावधीत व्याजासह परतफेड करावी लागते. शैक्षणिक कर्जामध्ये शिष्यवृत्तीची तरतूद नाही.

काय आहे दोन्हींमध्ये फरक?
विद्यार्थ्यांना पीएम विद्यालक्ष्मी योजनेंतर्गत विशेष सवलतीत व्याजदर मिळू शकतो. कारण, ही योजना सरकार अनुदानित आहे. या योजनेचा उद्देश विद्यार्थ्यांना कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देणे आहे. याउलट शैक्षणिक कर्जाचे व्याजदर बँक किंवा वित्तीय संस्था ठरवतात. सरकारकडून दिल्या जाणाऱ्या कर्जावर काही सवलती दिल्या जात असल्या तरी व्याजदर साधारणपणे जास्त असतात.

पीएम विद्यालक्ष्मी योजनेअंतर्गत, विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी सर्व कर्ज आणि शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची संधी मिळते. यासाठी केंद्रीकृत ऑनलाइन पोर्टलची व्यवस्था करण्यात आली आहे. येथे विद्यार्थी विविध विविध संस्थांकडे कर्ज आणि शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात. तसेच शैक्षणिक कर्जासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया प्रत्येक बँकेत वेगळी असू शकते. बहुतेक बँकांच्या स्वतःच्या विशिष्ट पात्रता अटी आणि अर्ज प्रक्रिया असते. कधीकधी हे कर्ज मिळवण्यासाठी बराच कालावधी लागू शकतो.

पीएम विद्यालक्ष्मी योजना विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क, राहण्याचा खर्च, प्रवास खर्च, पुस्तके आणि लॅपटॉप/संगणक यांसारख्या इतर आवश्यक गोष्टींसह विविध शैक्षणिक खर्चासाठी आर्थिक सहाय्य प्रदान करते. बँकांकडून विद्यार्थ्यांना देण्यात येणारी शैक्षणिक कर्जे प्रामुख्याने शिकवणी फी, कोचिंग फी, पुस्तक खर्च, वसतिगृह फी आणि इतर संबंधित खर्च समाविष्ट करतात. काही बँकांकडून लॅपटॉप आणि इतर उपकरणांसाठी कर्ज देखील दिले जाते. परंतु, ते काही बँकांच्या धोरणांवर अवलंबून असते.

Web Title: pm vidyalaxmi scheme vs education loan how different is pm vidyalaxmi yojana from education loan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.