मुंबई : पंजाब महाराष्ट्र को-ऑप. बॅँकेवरील निर्बंध आणखी वाढवतानाच भारतीय रिझर्व्ह बॅँकेने या बॅँकेच्या खातेदारांना दिलासा दिला आहे. खातेदार आता १ लाख रुपयांपर्यंतची रक्कम आपल्या खात्यातून काढू शकतील, असे रिझर्व्ह बॅँकेने जाहीर केले आहे. यामुळे बॅँकेच्या सुमारे ८४ टक्के खातेदारांना आपल्या खात्यातील संपूर्ण रक्कम मिळू शकेल, असा दावा रिझर्व्ह बॅँकेने केला आहे. याआधी बॅँकेच्या खातेदारांना ५० हजार रुपयापर्यंत रक्कम काढता येत होती.
दरम्यान, बॅँकेच्या खातेदारांनी रिझर्व्ह बॅँकेसमोर धरणे आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. फिजिकल डिस्टन्स पाळले असले तरी पोलिसांनी आम्हाला ताब्यात घेतले अशी तक्रार आंदोलन करणाऱ्या खातेदारांनी केली आहे.