Lokmat Money > बिझनेस न्यूज > ₹3 च्या शेअरला लागला अप्पर सर्किट, गुंतवणूकदार तुटून पडले; 5 जून महत्वाचा दिवस

₹3 च्या शेअरला लागला अप्पर सर्किट, गुंतवणूकदार तुटून पडले; 5 जून महत्वाचा दिवस

अलीकडेच कंपनीने आपले तिमाही निकाल जाहीर केले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2024 05:23 PM2024-05-28T17:23:02+5:302024-05-28T17:23:17+5:30

अलीकडेच कंपनीने आपले तिमाही निकाल जाहीर केले आहेत.

pmc fincorp limited stock price: Share hits upper circuit at ₹3, June 5 is an important day | ₹3 च्या शेअरला लागला अप्पर सर्किट, गुंतवणूकदार तुटून पडले; 5 जून महत्वाचा दिवस

₹3 च्या शेअरला लागला अप्पर सर्किट, गुंतवणूकदार तुटून पडले; 5 जून महत्वाचा दिवस

pmc fincorp limited stock price : मंगळवारी दिवसभरातील अस्थिर व्यवहारानंतर शेअर बाजार घसरणीसह बंद झाला आहे. बीएसई सेन्सेक्स 220 अंकांनी घसरून 75170 अंकांवर बंद झाला, तर निफ्टी 44 अंकांनी घसरून 22888 अंकांवर बंद झाला. पण, यादरम्यान  PMC Fincorp Limitedच्या शेअर्सला अप्पर सर्किट लागले. दिवसभरातील ट्रेडिंगदरम्यान हा स्टॉक BSE वर 20 टक्क्यांनी वधारला अन् 3.99 रुपयांवर पोहोचला. हा या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक आहे, तर याचा 52 आठवड्यांचा नीचांक रु. 1.40 आहे. दरम्यान, हा शेअर गेल्या ट्रेडिंग सत्रात 3.33 रुपयांवर बंद झाला होता. 

कंपनीने सोमवारी जारी केले निकाल 
गेल्या सोमवारी कंपनीने आपले तिमाही निकाल जाहीर केले. यात कंपनीची निव्वळ विक्री रु. 5.80 कोटी होती. गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत यात 131% वाढ झाली आहे. जर आपण निव्वळ नफ्याबद्दल बोललो, तर तो 3.85 कोटी रुपये आहे. हे मागील वर्षीच्या याच तिमाहीपेक्षा 772.47% अधिक आहे. Ebitda बद्दल बोलायचे तर ते 5.47 कोटी रुपये आहे. एका वर्षापूर्वीच्या याच कालावधीपेक्षा हे 575.31% अधिक आहे. 

कंपनीच्या बोर्डाची बैठक
कंपनीने BSE ला दिलेल्या माहितीनुसार, येत्या 5 जून रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीत इतर गोष्टींबरोबरच निधी उभारणीच्या प्रस्तावावर विचार होईल. याला बैठकीत मंजुरी मिळू शकते. निधी उभारण्यासाठी राईट इश्यू किंवा प्रेफरेंशियल इश्यूचा पर्याय विचारात घेता येईल. या व्यतिरिक्त, इक्विटी शेअर्स/कन्व्हर्टेबल सिक्युरिटीजसह इतर पद्धतींचाही विचार केला जाऊ शकतो. तसेच, इनसाइडर ट्रेडिंग रोखण्यासाठी कंपनीच्या सिक्युरिटीजमधील व्यवहारांची ट्रेडिंग विंडो निकालानंतर 48 तासांपर्यंत बंद राहील. शेअरहोल्डिंग पॅटर्नबद्दल बोलायचे तर प्रवर्तकाकडे कंपनीत 20.03 टक्के हिस्सा आहे, तर सार्वजनिक भागधारकांकडे 79.97 टक्के हिस्सा आहे.

(टीप-शेअर बाजारातगुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.)
 

Web Title: pmc fincorp limited stock price: Share hits upper circuit at ₹3, June 5 is an important day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.