Join us

PMJDY Aadhaar Link : जन धन खाते आणि आधार कार्ड लवकरात लवकर करा लिंक, 1.3 लाखांचा मिळेल लाभ!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2022 12:24 PM

PMJDY Aadhaar Link : जानेवारी 2020 च्या आकडेवारीनुसार, जन धन योजनेअंतर्गत देशात एकूण 44.23 कोटी बँक खाती उघडण्यात आली आहेत. या 44.23 कोटी खात्यांपैकी 33.9 कोटी खाती सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये उघडण्यात आली आहेत.

नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने 2014 मध्ये प्रधानमंत्री जन धन योजना (Pradhan Mantri Jan Dhan Yojana) सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून सरकारने देशातील प्रत्येक वर्गाला बँकिंग व्यवस्थेशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे. पूर्वी देशातील एक मोठा वर्ग होता, जो बँकिंग प्रणालीशी जोडलेला नव्हता. पण, ही योजना सुरू झाल्यापासून, आता जवळपास प्रत्येक देशवासीयाचे बँक खाते आहे. जन धन खाते हे एक शून्य शिल्लक खाते आहे, ज्यामध्ये सरकार विविध योजनांचे लाभ थेट खात्यातील लोकांना ट्रान्सफर करते. 

जानेवारी 2020 च्या आकडेवारीनुसार, जन धन योजनेअंतर्गत देशात एकूण 44.23 कोटी बँक खाती उघडण्यात आली आहेत. या 44.23 कोटी खात्यांपैकी 33.9 कोटी खाती सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये उघडण्यात आली आहेत. दुसरीकडे, ग्रामीण बँकांमध्ये 8.05 खाती आणि खाजगी बँकांमध्ये 1.28 खाती उघडण्यात आली आहेत. या खात्यात, थेट लाभ ट्रान्सफरव्यतिरिक्त सरकार लोकांना डेबिट कार्ड सुविधा देखील प्रदान करते. पण, जन धन खाती आधार कार्डशी लिंक करणे खूप महत्त्वाचे आहे. तसे न केल्यास लाखो रुपयांचे नुकसान होऊ शकते. चला तर मग जाणून घेऊया आधार कार्ड आणि जन धन खाते लिंक करणे का आवश्यक आहे आणि दोन्ही लिंक करण्याची प्रक्रिया काय आहे....

आधार कार्ड आणि जन धन खाते लिंक केल्यावर मिळेल 'हा' लाभ...जन धन खात्यामध्ये खातेधारकाला रुपे डेबिट कार्डची (Rupay Debit Card) सुविधा देखील मिळते. या कार्डमध्ये 1 लाखाचा अपघात विमा कवच उपलब्ध आहे. परंतु, खातेधारकाच्या नॉमिनीने जर त्याचे खाते आधार कार्डशी लिंक केले असेल तरच त्याला या विमा संरक्षणाचा लाभ घेता येईल. डेबिट कार्ड व्यतिरिक्त, खातेदाराला 30 हजार रुपयांच्या अपघाती मृत्यू विम्याचा स्वतंत्रपणे लाभ देखील मिळतो. अशा परिस्थितीत जनधन खाते लवकरात लवकर आधार कार्डशी लिंक करा.

आधार कार्ड आणि जनधन खाते लिंक करण्याची प्रक्रिया...- दोन्ही लिंक करण्यासाठी सर्वात आधी त्या बँकेत जा, जिथे तुम्हाला खाते लिंक करायचे आहे.- बँकेत जाताना आधार कार्डाची फोटो कॉपी सोबत घ्यावी.- येथे तुम्हाला दोन्ही लिंक करण्यासाठी एक फॉर्म भरावा लागेल.- यानंतर बँक तुमचे आधार कार्ड आणि जन धन खाते लिंक करेल.- याशिवाय तुम्ही मोबाईल एसएमएसद्वारेही लिंक करू शकता.- यासाठी तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून एसएमएस पाठवा. यासाठी UIDआधार क्रमांकखाते क्रमांक लिहा आणि 567676 या क्रमांकावर पाठवा.- यानंतर तुमचे आधार आणि जनधन खाते लिंक होईल.- याशिवाय तुम्ही दोन्ही बँकेच्या एटीएमशी लिंक करू शकता.

टॅग्स :व्यवसायबँक