Join us

तब्बल २२ टक्के नफा मिळवून देणारा फंड; ६ टक्के घसरण होऊनही सरासरी ४ % परतावा दिला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2023 9:59 AM

सर्वाधिक जोखीम असलेल्या स्मॉलकॅप फंडांनी सरासरी १८% परतावा दिला आहे.

नवी दिल्ली : पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिस (पीएमएस) फंड हे स्वनिर्धारित गुंतवणूक पोर्टफोलिओ आहेत ज्यात फक्त मोठे गुंतवणूकदारच भाग घेऊ शकतात. कारण यात किमान गुंतवणूक रक्कम ५० लाख रुपये आहे. पीएमएस फंडांनी २०२३ मध्ये शेअर बाजारात ६ टक्के घसरण होऊनही सरासरी ४% परतावा दिला आहे. या फंडांनी गेल्या १० वर्षांत सरासरी वार्षिक २२% परतावा दिला आहे, तर सर्वाधिक जोखीम असलेल्या स्मॉलकॅप फंडांनी सरासरी १८% परतावा दिला आहे.

म्युच्युअल फंड व पीएमएसमधील काय आहे फरक?

  • म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ५०० रुपयांपासून सुरू केली जाऊ शकते, परंतु पीएमएससाठी किमान गुंतवणूक रक्कम ५० लाख रुपये आहे.
  • बाजार नियामक सेबीद्वारे म्युच्युअल फंड शुल्क मर्यादित केले जात असताना, पीएमएसमध्ये स्पष्टीकरणाचे कठोर नियम नाहीत.
  • पीएमएस अशा सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करू शकते ज्यांचा बाजारात सहज व्यवहार करता येत नाही, तर म्युच्युअल फंड लिक्विड सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करतात.

तगडे रिटर्न्स

पीएमएस फंडांमध्ये गुंतवणूकदाराच्या उद्दिष्टांनुसार पोर्टफोलिओ तयार केला जातो. मनी मॅनेजर गुंतवणूकदारांचे पैसे शेअर्स आणि इतर सिक्युरिटीजमध्ये गुंतवतात. हा फंड प्रामुख्याने उच्च उत्पन्न असलेल्या व्यक्ती (एचएनआय), एचयूएफ, भागीदारी फर्म, एनआरआय आणि मोठ्या गुंतवणूकदारांमध्ये लोकप्रिय आहे.

म्युच्युअल फंड आणि पीएमएस...

म्युच्युअल फंड आणि पीएमएस दोन्ही व्यावसायिक फंड व्यवस्थापकांद्वारे व्यवस्थापित केलेले एकत्रित गुंतवणूक वाहने आहेत. दोन्ही गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे स्टॉक आणि बाँडमध्ये गुंतवण्याची परवानगी देतात, परंतु दोन्ही वेगवेगळ्या आहेत. म्युच्युअल फंड सामान्य, तर पीएमएस हे केवळ श्रीमंत गुंतवणूकदारांसाठी असतात.

हा फंड नेमका काेणता वर्ग घेताे?

पीएमएस फंडस्मध्ये अधिक रिटर्न असल्याने श्रीमंत गुंतवणूकदार, एचयूएफ, भागीदारी फर्म, एनआरआय हा फंड घेण्यास प्राधान्य देतात.

टॅग्स :शेअर बाजारव्यवसाय