Join us

केंद्र सरकारची 'ही' आहे सर्वात स्वस्त योजना, 2 लाखांची मिळतेय सुविधा!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2023 10:31 AM

Pradhan Mantri Suraksha Bima Yojana : प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा वार्षिक प्रीमियम फक्त 20 रुपये आहे. हा प्रीमियम तुम्हाला मे महिन्याच्या शेवटी भरावा लागेल.

नवी दिल्ली : महागाईच्या जमान्यात स्वस्त ऐकायला जरा विचित्र वाटतं, पण सरकार अशा अनेक योजना राबवत आहे, ज्या अतिशय स्वस्त आहेत. त्यापैकी एक म्हणजे पंतप्रधान सुरक्षा विमा योजना (Pradhan Mantri Suraksha Bima Yojana). या योजनेअंतर्गत अत्यंत कमी प्रीमियमवर जीवन विमा सुविधा मिळते. दरम्यान, पंतप्रधान सुरक्षा विमा योजना ही केंद्र सरकारची एक अशी योजना आहे, ज्या अंतर्गत खातेदाराला फक्त 20 रुपयांमध्ये 2 लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळते. 

केंद्र सरकारने काही वर्षांपूर्वी अत्यंत नाममात्र प्रीमियममध्ये प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना सुरू केली होती. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा वार्षिक प्रीमियम फक्त 20 रुपये आहे. हा प्रीमियम तुम्हाला मे महिन्याच्या शेवटी भरावा लागेल. ही रक्कम 31 मे रोजी तुमच्या बँक खात्यातून आपोआप कापली जाईल. जर तुम्ही प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना घेतली असेल, तर तुम्ही बँक खात्यात बॅलन्स निश्चित ठेवला पाहिजे.

काय आहेत प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचे नियम?18-70 वयोगटातील लोक प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेचा वार्षिक प्रीमियम फक्त 20 रुपये आहे. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा प्रीमियम देखील थेट बँक खात्यातून कापला जातो. पॉलिसी खरेदी करताना बँक खाते प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेशी जोडलेले असते. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेच्या पॉलिसीनुसार विमा खरेदी केलेल्या ग्राहकाचा अपघातात मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास नॉमिनीला 2 लाख रुपयांची रक्कम दिली जाते.

कसे होते रजिस्ट्रेशन?तुम्ही बँकेच्या कोणत्याही शाखेत जाऊन या प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेसाठी अर्ज करू शकता. बँक मित्र देखील प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना घरोघरी पोहोचवत आहेत. यासाठी विमा एजंटशीही संपर्क साधता येईल. सरकारी विमा कंपन्या आणि अनेक खाजगी विमा कंपन्या देखील ही योजना विकतात.

ऑटो-डेबिट मोडद्वारे जमा होतो प्रीमियम या प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा प्रीमियम ऑटो-डेबिट मोडद्वारे (Auto Debit Mode) जमा केला जातो. ही प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना 1 जून ते 31 मे पर्यंत वैध राहते. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे बँक खाते असणे आवश्यक आहे. तसेच, बँक खात्याशी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना जोडलेली असावी. या ऑटो-डेबिट मोडमुळे अनेक वेळा लोकांना समस्यांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत, पॉलिसीधारक ते निष्क्रिय देखील करू शकतो.

टॅग्स :पैसागुंतवणूकव्यवसाय