Lokmat Money > बिझनेस न्यूज > PMSBY : अरे व्वा! दरमहा फक्त 1 रुपया खर्च करा अन् 2 लाखांचा फायदा मिळवा; जाणून घ्या, कसं करायचं रजिस्ट्रेशन? 

PMSBY : अरे व्वा! दरमहा फक्त 1 रुपया खर्च करा अन् 2 लाखांचा फायदा मिळवा; जाणून घ्या, कसं करायचं रजिस्ट्रेशन? 

Pradhan Mantri Suraksha Bima Yojana : गरीब कुटुंबांची सामाजिक सुरक्षा लक्षात घेऊन सरकारने ही योजना आणली होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2021 11:12 AM2021-08-11T11:12:30+5:302021-08-11T11:18:42+5:30

Pradhan Mantri Suraksha Bima Yojana : गरीब कुटुंबांची सामाजिक सुरक्षा लक्षात घेऊन सरकारने ही योजना आणली होती.

pmsby scheme invest only 1 rupee get benefits of 2 lakh rupees pradhan mantri suraksha bima yojana | PMSBY : अरे व्वा! दरमहा फक्त 1 रुपया खर्च करा अन् 2 लाखांचा फायदा मिळवा; जाणून घ्या, कसं करायचं रजिस्ट्रेशन? 

PMSBY : अरे व्वा! दरमहा फक्त 1 रुपया खर्च करा अन् 2 लाखांचा फायदा मिळवा; जाणून घ्या, कसं करायचं रजिस्ट्रेशन? 

नवी दिल्ली - आजच्या काळात प्रत्येक व्यक्तीसाठी विमा ही एक अत्यावश्यक गोष्ट आहे. मात्र गरीब कुटुंबांना विम्याचा हप्ता भरणे खूप कठीण जाते. अशा मंडळींसाठी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (Pradhan Mantri Suraksha Bima Yojana) ही एक महत्त्वाची योजना आहे. गरीब कुटुंबांची सामाजिक सुरक्षा लक्षात घेऊन सरकारने ही योजना आणली होती. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत (PMSBY) 2 लाख रुपयांपर्यंत अपघाताचे कवच वार्षिक 12 रुपयांच्या प्रीमियमवर उपलब्ध आहे. म्हणजेच दरमहा फक्त 1 रुपया खर्च करून 2 लाखांचा फायदा मिळवता येणार आहे. 

जाणून घ्या, PMSBY साठी कसं करायचं रजिस्ट्रेशन? 

- सरकारच्या या योजनेत नोंदणी करणे खूप सोपे आहे. यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या कोणत्याही बँकेला भेट देऊन अर्ज करू शकता. 

- तुम्हाला हवे असल्यास तुम्ही विमा एजंटशी संपर्कही साधू शकता. सरकारी आणि खासगी विमा कंपन्या बँकांच्या सहकार्याने ही सेवा देतात.

PMSBY चे वार्षिक प्रीमियम फक्त 12 रुपये आहे म्हणजे फक्त 1 रुपये दरमहा आहे. दरवर्षी 31 मे पूर्वी प्रीमियमची रक्कम तुमच्या बँक खात्यातून आपोआप वजा केली जाईल आणि तुम्हाला 1 जून ते 31 मे या कालावधीसाठी संरक्षण मिळेल. या योजनेअंतर्गत विमाधारक व्यक्तीचा अपघातात मृत्यू झाला किंवा तो पूर्णपणे अपंग झाला तर त्याला 2 लाख रुपयांचा अपघात विमा मिळतो. 

योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो? 

- 18 ते 70 वर्षांपर्यंत कोणतीही व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकते. 

- वयाची 70 वर्षे ओलांडल्यावर कव्हर समाप्त होईल. 

- या योजनेचा लाभ घेण्यासाठी बँकेत खाते असणे आवश्यक आहे. 

- प्रीमियमच्या कपातीदरम्यान खात्यात बॅलेन्स असणं गरजेचं आहे. 

- बॅलेन्स नसल्यास पॉलिसी आपोआप होईल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

Web Title: pmsby scheme invest only 1 rupee get benefits of 2 lakh rupees pradhan mantri suraksha bima yojana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.