मुंबई - पी. एन. गाडगीळ ज्वेलर्स लिमिटेडने ४८० रुपये प्रति इक्विटी शेअर या प्राइस बँडच्या किमतीत २५ अँकर गुंतवणूकदारांकडून ३३० कोटी उभारले. अँकर गुंतवणूकदारांना ६८,७४,९९९ शेअर्सचे वाटप केले आहे.
आयपीओच्या पार्श्वभूमीवर प्रति इक्विटी शेअर १० रुपयांच्या दर्शनी मूल्यासह ४८० रुपये प्रतिइक्विटी शेअरप्रमाणे ही गुंतवणूक उभारली. ३३,५४,१९९ इक्विटी शेअर्सचे १८ योजनांद्वारे १० घरगुती म्युच्युअल फंडांना वाटप केले. ऑफरमध्ये प्रत्येकी ८५० कोटीपर्यंतच्या दर्शनी मूल्याच्या १० रुपयांच्या इक्विटी शेअर्सचा नवीन इश्यू आणि २५० कोटींपर्यंत प्रत्येकी १० रुपयांच्या दर्शनी मूल्याच्या इक्विटी शेअर्सच्या विक्री समाविष्ट आहे.
एकूण ऑफर आकारात प्रत्येकी १० रुपयांचे दर्शनी मूल्य असलेले इक्विटी शेअर्स ११०० कोटींपर्यंत असतील. विक्रीच्या ऑफरमध्ये एसव्हीजी बिझनेस ट्रस्ट (प्रमोटर सेलिंग शेअरहोल्डर) द्वारे २५० कोटींपर्यंत प्रत्येकी १० रुपयांच्या दर्शनी मूल्याच्या इक्विटी शेअर्सचा समावेश आहे. ऑफरची शेवटची तारीख १२ सप्टेंबर २०२४ ही आहे. मोतीलाल ओसवाल इन्व्हेस्टमेंट ॲडव्हायझर्स लिमिटेड, नुवामा वेल्थमॅनेजमेंट लिमिटेड (पूर्वी एडलवाइस सिक्युरिटीज लिमिटेड म्हणून ओळखले जाणारे) व बीओबी कॅपिटल मार्केट्स लिमिटेड या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत.