नवी दिल्ली : सरकारी आणि खासगी बँकांमध्ये खाती असलेल्या करोडो ग्राहकांना मोठा झटका बसला आहे. तुमचेही बँक खाते असेल तर आता तुम्हाला जास्त पैसे खर्च करावे लागतील. आयसीआयसीआय बँक (ICICI Bank) आणि पंजाब नॅशनल बँकेने (Punjab National Bank) एमसीएलआर (MCLR) दर वाढवले आहेत. त्यामुळे खातेदारांच्या ईएमआयमध्ये वाढ झाली आहे. आयसीआयसीआय बँकेने काही कालावधीसाठी व्याजदरात कपात केली आहे, तर पंजाब नॅशनल बँकेने सर्व कालावधीसाठी व्याजदरात वाढ केली आहे.
आयसीआयसीआय बँकेने कमी केले दर!खाजगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बँकेबद्दल बोलायचे तर या बँकेने व्याजदरात कपात केली आहे, म्हणजेच ग्राहकांचा ईएमआय कमी झाला आहे. बँकेने ओव्हरनाइट व्याजदर 8.50 टक्क्यांवरून 8.35 टक्के केला आहे. याशिवाय 3 महिन्यांसाठीचे दरही 15 बेसिस पॉईंटने कमी केले आहेत. त्याचे दर 8.55 टक्क्यांवरून 8.40 टक्क्यांवर आले आहेत. आयसीआयसीआय बँकेच्या 6 महिने आणि एक वर्षाच्या कालावधीच्या व्याजदरांबद्दल बोलायचे झाल्यास, बँकेने त्यात वाढ केली आहे. यामध्ये बँकेने 5 बेसिस पॉइंट्सची वाढ केली आहे. यामध्ये तुम्हाला 8.85 टक्के दराने व्याज द्यावे लागेल.
1 जूनपासून पंजाब नॅशनल बँकेचे नवे दर लागूदेशातील सरकारी बँक पंजाब नॅशनल बँकेने सर्व कालावधीसाठी व्याजदर वाढवले आहेत. पंजाब नॅशनल बँकेने MCLR दर 10 बेसिस पॉईंटने वाढवले आहेत. बँकेचे नवे व्याजदर 1 जूनपासून लागू झाले आहेत. पंजाब नॅशनल बँकेच्या अधिकृत वेबसाइटनुसार, बँकेने ओव्हरनाइट MCLR दर 10 बेस पॉईंटने वाढवले आहेत, त्यानंतर व्याजदर 8 वरून 8.10 टक्क्यांनी वाढला आहे.
कोणत्या कालावधीसाठी MCLR दर किती झाले आहेत?याशिवाय एक महिना, 3 महिने आणि 6 महिन्यांचे दरही वाढले आहेत. एक महिन्याचा व्याजदर 8.20 टक्के, 3 महिन्यांचा व्याजदर 8.30 टक्के, 6 महिन्यांचा व्याजदर 8.50 टक्के झाला आहे. तसेच, एक वर्षाचा MCLR दर 8.60 टक्के आणि 3 वर्षांचा MCLR दर 8.90 टक्के करण्यात आला आहे.
ईएमआयवर दिसून येईल परिणामबँकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, जर आपण वेगवेगळ्या कालावधीच्या व्याजदराबद्दल बोललो तर कालपासून तुमचा ईएमआय वाढला आहे. यापुढे तुम्हाला जास्त पैसे खर्च करावे लागतील. याशिवाय, आयसीआयसीआय बँकेने व्याजदरात कपात केली आहे, त्यामुळे तुमचा ईएमआय कमी होईल.