Lokmat Money > बिझनेस न्यूज > अलर्ट! 'या' बँकेचं चेकबुक 1 ऑक्टोबरपासून होणार बंद, नव्यासाठी 'असं' करा अप्लाय अन्यथा...

अलर्ट! 'या' बँकेचं चेकबुक 1 ऑक्टोबरपासून होणार बंद, नव्यासाठी 'असं' करा अप्लाय अन्यथा...

Cheque book alert : जर तुमच्याकडे या बँकांची जुनी चेकबुक असतील तर नवीन चेकबुकसाठी अर्ज करा, जेणेकरून तुम्हाला पुढचे व्यवहार करताना कोणतीही अडचण येणार नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2021 11:02 AM2021-09-22T11:02:06+5:302021-09-22T11:02:38+5:30

Cheque book alert : जर तुमच्याकडे या बँकांची जुनी चेकबुक असतील तर नवीन चेकबुकसाठी अर्ज करा, जेणेकरून तुम्हाला पुढचे व्यवहार करताना कोणतीही अडचण येणार नाही.

pnb cheque book alert how to get pnb cheque book online from1st october | अलर्ट! 'या' बँकेचं चेकबुक 1 ऑक्टोबरपासून होणार बंद, नव्यासाठी 'असं' करा अप्लाय अन्यथा...

अलर्ट! 'या' बँकेचं चेकबुक 1 ऑक्टोबरपासून होणार बंद, नव्यासाठी 'असं' करा अप्लाय अन्यथा...

नवी दिल्ली - देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या सरकारी बँकेत म्हणजेच पीएनबीमध्ये (PNB)  जर तुमचं खातं असेल तर तुमच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. पीएनबीने आपल्या चेकबुकसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. पंजाब नॅशनल बँकेने (PNB) आपल्या ग्राहकांना दिलेल्या माहितीनुसार, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स (OBC) आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया (UBI) चे चेकबुक 1 ऑक्टोबरपासून बंद होणार आहे. म्हणून जर तुमच्याकडे या बँकांची जुनी चेकबुक असतील तर नवीन चेकबुकसाठी अर्ज करा, जेणेकरून तुम्हाला पुढचे व्यवहार करताना कोणतीही अडचण येणार नाही. बँकेत जाऊन तुम्ही नवीन चेकबुक सहज मिळवू शकता.

1 एप्रिल 2020 रोजी OBC आणि UBI चे PNB मध्ये विलीनीकरण झाली. आता ग्राहकापासून दोन्ही बँकांच्या शाखेपर्यंत सर्व काही पीएनबीचे आहे. पीएनबीने सोशल मीडियाद्वारे 1 ऑक्टोबर 2021 पासून ई-ओबीसी आणि ई-यूबीआयच्या जुन्या चेकबुक बंद केल्या जातील. ओबीसी आणि यूबीआयचे जुने चेकबुक पीएनबीच्या नवीन चेकबुकसह बदला असं सांगितलं आहे. तसेच हे चेकबुक पीएनबीच्या अद्ययावत आयएफएससी कोड आणि एमआयआरसीसह येईल. पीएनबीने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून देखील ग्राहकांना यााबाबत माहिती दिली आहे. 

'या' क्रमांकावर करा कॉल अन् मिळवा नवं चेकबुक 

पीएनबीने आपल्या ट्विटमध्ये ग्राहक नवीन चेकबुकसाठी बँक शाखा किंवा बँक एटीएम किंवा पीएनबी वनद्वारे अर्ज करू शकतो. याशिवाय ग्राहक इंटरनेट बँकिंगद्वारे पीएनबीच्या अद्ययावत नवीन चेकबुकसाठी अर्ज करू शकतात असं म्हटलं आहे. पीएनबीने म्हटले आहे की, नवीन चेकबुकवर पीएनबीचे आयएफएससी आणि एमआयआरसी कोड लिहिले जातील. बँकेने टोल फ्री क्रमांक 18001802222 देखील जारी केला आहे. ग्राहक या पुस्तकावर कॉल करून चेकबुकबद्दल तपशील मिळवू शकतात.

ऑनलाईन पेमेंट करताना IFSC चा वापर

इंडियन फायनेंसियल सिस्टम कोड (IFSC) हा 11 अंकी कोड आहे. या कोडमध्ये पहिली चार अक्षरे बँकेचे नाव दर्शवतात. ऑनलाईन पेमेंट करताना IFSC चा वापर केला जातो. बँकेच्या कोणत्याही शाखेचा त्या कोडद्वारे मागोवा घेतला जाऊ शकतो. बँकेच्या प्रत्येक शाखेला स्वतंत्र IFSC आहे. मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रिकग्निशन (MICR) कोड हा 9 अंकी कोड आहे. हे त्या बँक शाखा ओळखते जे वापरतात (इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सिस्टम). या कोडमध्ये बँक कोड, खाते तपशील, रक्कम आणि चेक नंबर सारखे तपशील असतात. हा कोड चेकच्या खालच्या भागात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Web Title: pnb cheque book alert how to get pnb cheque book online from1st october

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.