Lokmat Money > बिझनेस न्यूज > Saving: बचत खात्यावरील व्याजात पीएनबीने केली कपात, ठेवीदारांना बसणार मोठा फटका  

Saving: बचत खात्यावरील व्याजात पीएनबीने केली कपात, ठेवीदारांना बसणार मोठा फटका  

PNB cuts interest: पंजाब नॅशनल बँकेने (पीएनबी) आपल्या बचत खात्यावरील व्याजदरात कपात केली आहे. १० लाख रुपयांपेक्षा कमी शिल्लक असलेल्या बँक खात्यावरील व्याजदर ०.०५ टक्क्यांनी कमी करून २.७५ टक्क्यांवरून २.७० टक्क्यांवर आणण्यात आला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2022 06:26 AM2022-04-06T06:26:02+5:302022-04-06T06:26:30+5:30

PNB cuts interest: पंजाब नॅशनल बँकेने (पीएनबी) आपल्या बचत खात्यावरील व्याजदरात कपात केली आहे. १० लाख रुपयांपेक्षा कमी शिल्लक असलेल्या बँक खात्यावरील व्याजदर ०.०५ टक्क्यांनी कमी करून २.७५ टक्क्यांवरून २.७० टक्क्यांवर आणण्यात आला आहे.

PNB cuts interest on savings accounts | Saving: बचत खात्यावरील व्याजात पीएनबीने केली कपात, ठेवीदारांना बसणार मोठा फटका  

Saving: बचत खात्यावरील व्याजात पीएनबीने केली कपात, ठेवीदारांना बसणार मोठा फटका  

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेने (पीएनबी) आपल्या बचत खात्यावरील व्याजदरात कपात केली आहे. १० लाख रुपयांपेक्षा कमी शिल्लक असलेल्या बँक खात्यावरील व्याजदर ०.०५ टक्क्यांनी कमी करून २.७५ टक्क्यांवरून २.७० टक्क्यांवर आणण्यात आला आहे. १० लाख ते ५०० कोटी रुपयांच्या शिलकीवरील व्याजदरही ०.०५ टक्क्यांनी कमी करून २.७५ टक्के करण्यात आला आहे. ४ एप्रिलपासून नवे व्याजदर लागू झाले आहेत.
पीएनबीने दोन महिन्यांत केलेली ही दुसरी व्याजदर कपात आहे. याआधी फेब्रुवारी २०२२ मध्ये बँकेने ०.०५ टक्क्यांची व्याजदर कपात केली होती. तेव्हा १० लाखांपर्यंतच्या शिलकीवरील व्याजदर २.७५ टक्क्यांवर, तर १० लाख ते ५०० कोटी रुपये शिलकीच्या खात्यांवरील व्याजदर २.८० टक्क्यांवर आणण्यात आला होता.

Web Title: PNB cuts interest on savings accounts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.