नवी दिल्ली : तुम्ही एखादे स्वस्त घर किंवा प्रॉपर्टी खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी एक संधी आहे. पंजाब नॅशनल बँकेकडून प्रॉपर्टीचा लिलाव करण्यात येणार आहे. यामध्ये रेसिडेंशिअल, कॉमर्शिअल आणि इंडस्ट्रिअल प्रकारच्या प्रॉपर्टींचा समावेश आहे. दरम्यान, IBAPI (Indian Banks Auctions Mortgaged Properties Information) कडून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. ही अशी प्रॉपर्टी आहे, जी डिफॉल्टच्या लिस्टमध्ये आली आहे. (pnb e-auction for properties of residential and commercial on 12th may 2021 check full details here)
पंजाब नॅशनल बँकेकडून ट्विटद्वारे माहिती
पंजाब नॅशनल बँकेने आपल्या ऑफिशियल ट्विटर हँडलवर ट्वीट करत माहिती दिली आहे. बँकेने ट्विटमध्ये म्हटले आहे की, 15 मे 2021 रोजी निवासी आणि व्यावसायिक मालमत्तांचा ई-लिलाव होणार आहे. तुम्ही येथे योग्य किंमतीमध्ये मालमत्ता खरेदी करू शकता.
Participate for the best prices!
— Punjab National Bank (@pnbindia) May 11, 2021
Get residential and commercial property through PNB e-Auction being held on 12th May 2021.
To know more, visit e-Bikray Portal: https://t.co/N1l10s1hyqpic.twitter.com/Rs6x4lg5Xk
किती आहे प्रॉपर्टी?
पंजाब नॅशनल बँकेने दिलेल्या माहितीनुसार 10902 रेसिडेंशियल प्रॉपर्टी, 2469 कमर्शियल प्रॉपटी, 1241 इंडस्ट्रियल प्रॉपर्टी, 70 अॅग्रीकल्चर प्रॉपर्टी असणार आहे. यापैकी ज्या प्रॉपर्टीची खरेदी तुम्ही करणार आहात, त्याकरता तुम्हाला बोली लावता येईल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा
प्रॉपर्टीच्या लिलावाबाबत अधिक माहितीसाठी तुम्ही https://ibapi.in/ या लिंकवर भेट देऊ शकता. बँकेच्या म्हणण्यानुसार, या लिलावासाठी जाहीर केलेल्या सार्वजनिक नोटीसमध्ये प्रॉपर्टीच्या फ्रीहोल्ड किंवा लीडहोल्ड होणाऱ्या, जागा, मोजमापबद्दलची माहिती दिली जाते. ई-लिलावाद्वारे तुम्हाला प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर तुम्ही बँकेत जाऊन प्रक्रिया व त्यासंबंधित मालमत्तेची माहिती घेऊ शकता.
डिफॉल्ट प्रॉपर्टीचा होतो लिलाव
एखाद्या प्रॉपर्टीसाठी घेण्यात आलेलं कर्ज फेडलं नाही किंवा कोणत्याही कारणामुळे तर ती रक्कम बँकेला दिली नाही तर त्या सर्व लोकांची जमीन बँकेद्वारे ताब्यात घेतली जाते. पंजाब नॅशनल बँकेकडूनही अशा प्रॉपर्टीचा लिलाव केला जातो. या लिलावातून बँक ती प्रॉपर्टी विकून संपूर्ण रक्कम वसूल करते.